उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

उमरगा: संतोष दंडगुले, रा. मुळज हे 20 एप्रिल रोजी 21.30 वाजता मोटार सायकलने त्रिकोळी मार्गे जात होते. यावेळी प्रदिप काळे यांनी अचानक ब्रेक मारले. संतोष यांनी त्याबाबत विचारपुस केली. यावरुन प्रदिप काळे, विठठल कुरलेकर व दोन अज्ञात  यांनी मिळुन संतोष  यांना शिवीगाळ करुन दगड व कत्तीने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संतोष दंडगुले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी: ज्ञानोबा पौळ, रा. पाथ्रुड, ता. भुम हे  मुलगा-रोहन यांचेसह 21 एप्रिल रोजी 09.30 वाजता डोकेवाडी येथे सुन हीस आणण्यास गेले होते. यावेळी येताळ थोरात, सुंदर येताळ यांनी ज्ञानोबा-रोहन या पिता-पुत्रांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने  मारहाण करुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या ज्ञानोबा पौळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन  भा. दं. सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी: प्रकाश बाबुराव दांगट, रा. खेड, ता. उस्मानाबाद हे 21 एप्रिल रोजी 18.30 वाजता मोटार सायकलने शेतातुन घराकडे येत होते. यावेळी गावकरी- धनाजी चव्हाण, संताजी चव्हाण, प्रविण चव्हाण  यांनी जुन्या वादातुन प्रकाश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांने मारुन दात पाडले व काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या प्रकाश दांगट यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भा. दं. सं. कलम- 325, 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 उस्मानाबाद -  ईस्माईल शेख यांनी 21 एप्रील रोजी 18.45 वा. आनंदनगर, उस्मानाबाद येथे जनता कर्फयुचे उल्लंघन करुन जेन्टस पार्लर व्यवसायास चालू ठेवुन कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची घातक कृती करुन भा. दं. सं. कलम- 188, 269 प्रमाणे उल्लंघन केले.

                                                                                   

From around the web