उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

वाशी : किरण विनायक शिंदे, रा. सरमकुंडी ता. वाशी हे दि. 08.04.2021 रोजी 15.30 वा.  आपले शेतातील घरासमोर होते. यावेळी गावकरी रमेश, कुशावर्ता, हानुमंत शिंदे यांनी जुन्या वादावरुन किरण यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली व लोखंडी गजाने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या किरण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद: मिलींद रामलिंग झाडे, रा. उस्मानाबाद हे दि. 11.04.2021 रोजी 10.30 वा.  आपले घरासमोर होते. यावेळी शहरातील योगेश, युवराज हुच्चे व दुर्गेश, गोटया दिवटे यांनी मिलींद यांना व त्यांचे नातेवाईकांना मागील झालेल्या वादातुन शिवीगाळ करुन काठीने व विटाने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या  मिलींद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम  324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा : राम प्रल्हाद जाधव, रा. कदेर ता. उमरगा हे 11 एप्रिल रोजी 16.45 वा. भुसणी येथे कामाला जात होते. यावेळी गावकरी कमलाकर चौधरी यांनी राम यांचा रस्ता आडवला. तसेच ग्राम पंचायत निवडणुकमध्ये तु आमच्या पॅनलला मदत का केली नाही असे म्हणुन शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राम जाधव यांनी दि. 11 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 341, 504, 506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

बेंबळी : शिवाजी गोरोबा मनसुळे रा. समुद्रवाणी यांच्या शेतातील पत्रेचे शेडचा दरवाजा अज्ञाताने 10-11 एप्रिल च्या दरम्यान तोडुन आतील 55,000 रु. किंमतीचे दोन जनावरे चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अपहरण

 कळंब: कळंब पो. ठा. हददीतील एका गावातील 16 वर्षीय मुलगी 11 एप्रिल रोजी मध्यरात्री घरातुन बेपत्ता झाल्याने कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता तीची काही माहीती मिळाली नाही. यावरुन तीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या पित्याने 11 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन  भा. दं. सं. कलम 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.                    

From around the web