उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 

ढोकी: राजाराम निवृत्ती वाकडे रा. तडवळा (कसबे) हे दि.04/04/2021 रोजी पत्नी कांताबाई मुलगा दादा व विजय यांसह गावातील शेतात होते. यावेळी भाऊबंद- मुकुंद वाकडे यांसह त्यांची दोन मुले हनुमंत व परशुराम  तसेच तात्या व अशोक अनंता वाकडे या दोघा भावांनी मिळुन शेतीबांधाच्या दुरुस्तीच्या कारणावरुन राजाराम वाकडे कुटुंबीयांना शिवीगाळ करुन काठीने , दगडाने मारहाण केली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं.कलम 324,143,147,149,504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
कळंब : शाम सुदंर देशपांडे रा.सावरगांव ता.कळंब यांच्या पुर्नवसन सावरगांव येथील घरास एक राखणदार आहे.  3 एप्रिल रोजी या राखणदारास कळंब येथील विनायक बळीराम माने व अन्य एका पुरुषाने खुनाची धमकी देवुन तेथुन निघुन जाण्यास सांगितले व नमुद घरास व कुंपनास कुलुप बंद केले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं.कलम 448,451,452,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 शिराढोण : रामदास बोंदर रा,वडगांव हे 5 एप्रिल रोजी सकाळी 09.30 वा गावातील चौकात होते. यावेळी भाऊबंद – संतोष , अमर, सखाराम, मेघराज, विजय, सुमन, यांनी दुकान बंद करण्याच्या वादातुन काठीने, कु-हाडीने मारहाण करुन जखमी केले आहे. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं.कलम 324,326,143,147,149,504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web