उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 

 मुरुम: राजेंद्र शंकर केरुरे, रा. भोसगा, ता. लोहारा हे 25 मार्च रोजी 19.00 वा. सु. आपल्या घरासमोर थांबले होते. यावेळी शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन भाऊबंद- सचिन केरुरे, धोंडाबाई केरुरे, मनिषा केरुरे, रुपाली केरुरे या चौघांनी राजेंद्र केरुरे यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राजेंद्र केरुरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद (ग्रा.): सुग्रीव दासु काळे, रा. भानसगाव, ता. उस्मानाबाद हे 25 मार्च रोजी 09.30 वा. गावातील मंदीराजवळील कठड्यावर बसले होते. यावेळी पुर्वीच्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन गावकरी- अविनाश मचाले, धनाजी मचाले, अमोल मचाले, सागर काळे अशा चौघांनी सुग्रीव काळे यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, साखळी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुग्रीव काळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी: ईर्ला, ता. उस्मानाबाद येथील सुनंदा कुंडलिक चौरे यांसह 5 कुटूंबीय व महादेवी रामदास चौरे यांसह 3 कुटूंबीय अशा दोन्ही कुटूंबाचा 25 मार्च रोजी 06.00 वा. सु. राहत्या गल्लीत पुर्वीच्या भांडणावरुन वाद उद्भवला. यात दोन्ही कुटूंबातील स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, वीटांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुनंदा चौरे व महादेवी चौरे यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 452 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web