उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद एमआयडीसी समोरील उड्डान पुलाखाली 23 मार्च रोजी 16.30 वा. सु. भांडण सुरु होते. यावेळी रफिक सलीम शेख, रा. उस्मानाबाद हे ते भांडण सोडवण्यास गेले असता तेथील 1)निखील राठोड, उस्मानाबाद 2)देवा राठोड, रा. जहागीरदारवाडी 3)सचिन (पुर्ण नाव उपलब्ध नाही) यांनी रफिक शेख यांना लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रफिक शेख यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी: सुशीला राजेंद्र उंबरे, रा. वाणेवाडी, ता. उस्मानाबाद या 25 मार्च रोजी वाणेवाडी गट क्र. 216 मधील आपल्या शेतात पिकाची काढणी करत होत्या. यावेळी शेतजमीनीच्या पुर्वीच्या वादावरुन गावकरी- विष्णु सुर्यभान शिराळ व अविनाश शिराळ यांनी सुशीला उंबरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विळ्याने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत सुशीला यांच्या हातास विळ्याचा मार लागून गंभीर दुखापत झाली. अशा मजकुराच्या सुशीला उंबरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद (ग्रा.): वरुडा, ता. उस्मानाबाद येथील लहु सदाशिव मगर यांसह पाच कुटूंबीय व प्रकाश वसंत मगर यांसह तीघे कुटूंबीय अशा दोन्ही गटांचा 24 मार्च रोजी 07.00 वा. सु. शेत जमीन मोजणीच्या कारणावरुन वाद उद्भवला. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, वीटांनी, लोखंडी पाईप, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या लहु मगर व प्रकाश मगर यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

                                                                                   

From around the web