उमरगा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेउन दागिने चोरणारा चोर रंगेहात अटकेत

 
उमरगा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेउन दागिने चोरणारा चोर रंगेहात अटकेत

उमरगा: बोळेगाव, ता. तुळजापूर येथील सुशीलाबाई कोंडीबा मदने या 22 फेब्रुवारी रोजी 13.45 वा. सु. उमरगा बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना एका अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम सोन्याची बोरमाळ गर्दीचा फायदा घेउन चोरली. बोरमाळ चोरल्याचे लक्षात येताच सुशीलाबाई मदने यांनी आरडा- ओरड करुन त्या अज्ञाताच्या दिशेने धाव घेतली असता त्याच्या साथीदाराने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसस्थानकातील प्रवासी व कर्तव्यास असलेले पोलीस यांनी आकाश बाळु पवार, रा. कवठा, ता. उमरगा याचा पाठलाग करुन पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ आकाश जवळ सुशीलाबाई यांची नमूद बोरमाळा आढळली. यावरुन पोलीसांनी आकाश पवार यास अटक करुन त्याच्याविरुध्द उमरगा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून गुन्ह्यातील त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

 जुगार विरोधी कारवाई

मुरुम: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन मुरुम पोलीसांनी 21 फेब्रुवारी रोजी 20.05 वा. पो.ठा. हद्दीतील तुगाव येथे छापा मारला. यावेळी तुगाव येथील ग्रामपंचायतमागील एका पत्रा शेडमध्ये 1)विजय मुळे 2)प्रेमनाथ काळे 3)अशोक बिराजदार 4)गोपाळ सुरवसे 5)मिया जमादार 6)युनुस शेख 7)महेश साळुंके 8)मुस्तफा जमादार 9)कुंडलीक बंडगर 10)सुरेश राठोड 11)सुधाकर गायकवाड, सर्व रा. तुगाव, ता. उमरगा हे तिरट जुगार साहित्य व 7,430 ₹ रोख रक्कम बाळगलेले पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अवैध मद्य विरोधी कारवाया

 मुरुम: सचिन शरणाप्पा बारुळे, रा. तुगाव, ता. उमरगा हे 21 फेब्रुवारी रोजी गावातील चौकात विदेशी दारुच्या 7 बाटल्या (किं.अं. 940 ₹) अवैधपणे बाळगले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): मंगलबाई राम काळे, रा. गडदेवधरी, उस्मानाबाद या 22 फेब्रुवारी रोजी राहत्या परिसरात देशी दारुच्या 17 बाटल्या (किं.अं. 884 ₹) अवैधपणे बाळगल्या असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळल्या.

पोलीस ठाणे, भुम: वालवड, ता. भुम येथील 1)संतोष श्रीराम सुर्यवंशी 2)प्रकाश कैलास शिंदे हे 22 फेब्रुवारी रोजी गावातील बसस्थानकमागे देशी दारुच्या 43 बाटल्या (किं.अं. 5,564 ₹) अवैधपणे बाळगले असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम यांच्या पथकास आढळले.

       यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web