राघुचीवाडी, मुरुम येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

उस्मानाबाद -  बाळासाहेब नागनाथ नलवडे, रा. राघुचीवाडी, ता. उस्मानाबाद यांसह त्यांचे मित्र दि. 27- 28.05.2021 दरम्यानच्या रात्री राघुचीवाडी शेत शिवारातील पत्रा शेडसमोर झोपले होते. दरम्यानच्या रात्री त्यांच्या उषाजवळील तीन स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या बाळासाहेब नलवडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मुरुम: बालाजी वसंतराव वाडीकर, रा. मुरुम, ता. उमरगा यांचा मुरुम- आष्टाकासार रस्त्यालगतच्या बेनितुरा धरणातील ॲनसन्स कंपनीचा 10 अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विद्युत पंप दि. 26- 28.05.2021 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या बालाजी वाडीकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web