उस्मानाबाद,सावरगांव,खामगांव, भुसणी येथे चोरीची घटना 

 
उस्मानाबाद,सावरगांव,खामगांव, भुसणी येथे चोरीची घटना

तामलवाडी: बालाजी शिकु पवार, रा. सावरगांव, ता. तुळजापूर यांच्या सावरगांव गट क्र. 103 मधील शेतातील मिनी तुषारसिंचन संच अज्ञात व्यक्तीने दि. 09.05.2021 रोतीच्या रात्री चोरुन नेला. अशा मजकुराच्या बालाजी पवार यांनी 17 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी: खामगांव, ता. उस्मानाबाद येथील तडवळा रस्त्यालगतच्या ‘ॲग्रो प्रोड्युसर कंपनी’ च्या गुदामाचा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि. 16- 17.05.2021 दरम्यानच्या रात्री उचकटून आतील प्रत्येकी 50 कि.ग्रॅ. वजनाचे 50 पोती सोयाबीन चोरुन नेले. अशा मजकुराच्या व्यवसाईक- कैलास विठ्ठल शिनगारे, रा. खामगांव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद  : सुरज दत्ता वाघमारे, रा. बौध्दनगर, उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एजी 8404 ही दि. 15 मे रोजी 16.00 ते 1800 वा. सु. मारवाड गल्ली, उस्मानाबाद येथील स्वयम आजमेरा यांच्या घरासमोर लावली असता ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुरज वाघमारे यांनी दि. 17 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम: सतीश संभा कांबळे, रा. भुसणी, ता. उमरगा यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 14 ईजी 9294 ही दि. 14 मे रोजी 22.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 05.00 वा. सु. ती मो.सा. त्यांना लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सतीश कांबळे यांनी दि. 17 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद :  नितीन राजेनिंबाळकर, रा. राजेवस्ती, उस्मानाबाद यांची सीडी डॉन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 जे 7523 ही दि. 12- 13.05.2021 दरम्यानच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नितीन राजेनिंबाळकर यांनी 17 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web