उस्मानाबाद सांगवी,नळदुर्ग येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

तामलवाडी: विश्वास मधुकर काळे, रा. सांगवी (काठी), ता. तुळजापूर यांची सांगवी- माळुंब्रा साठवण तलावातील रत्ना कंपनीचा पानबुडी विद्युत पंप, 50 फुट केबल, स्टार्टर इत्यादी साहित्य दि. 20- 21.05.2021 दरम्याच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विश्वास काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग: रेखा विलास देशमुख, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर या कुटूंबीयांसह दि. 20- 21.05.2021 रोजी दरम्यान बाहेर गावी गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा अज्ञात व्यक्तीने तोडून आतील 8 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने- वस्तू व 50,000 ₹ रोख रक्कम असे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या रेखा देशमुख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  उस्मानाबाद येथील जुनी जिल्हा शिक्षण- प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमधील प्राचार्य कक्षाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 01.10.2020 ते 10.05.2021 रोजी दरम्यान तोडून आतील गॅस गिजर- 1 नग, गॅस पाईप व रेगुलेटर, ध्वनी यंत्रना, बेडशिट- 40 नग, चादर- 40 नग असे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या कर्मचारी- बाळासाहेब रामलिंग कुदळे, रा. जिजाउनगर, उस्मानाबाद यांनी दि. 21 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web