उस्मानाबाद, जळकोट, मार्डी, पिंपळा येथे चोरीची घटना  

 
Osmanabad police

नळदुर्ग: स्वदेश शिवाजी लोखंडे, रा. जळकोट, ता. तुळजापूर यांच्या शेत गट क्र. 747 मधील सौर उर्जा यंत्रसंचातील सोलार मोटार दि. 04- 05-.06.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या स्वदेश लोखंडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 लोहारा: सत्यवान व किरण सत्यवान तोरंबे, रा. उस्मानाबाद हे दोघे पती- पत्नी दि. 05 जून रोजी 13.30 वा. सु. मार्डी शिवारातील आश्रम शाळेजवळील रस्त्यावरुन मोटारसायकलने प्रवास करत होते. दरम्यान ते दोघे लघुशंकेसाठी थांबले असता त्यांनी त्यांच्या जवळील 37 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक भ्रमणध्वनी असलेली पर्स मो.सा. ला अडकवलेली अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या किरण तोरंबे यांनी दिलेल्या प्रथम खबरेरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद : जिनत निलेश प्रधान, रा. उस्मानाबाद या दि. 05 जून रोजी 11.15 वा.सु. शहरातील देशपांडे स्टॅड येथील भाजी मंडईत खरेदी करत असतांना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदाघेउन त्यांच्या पर्समधील भ्रमणध्वनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या जिनत प्रधान यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी: विकास कोंडीबा वाघमोडे, रा. पिंपळा (बु.), ता. तुळजापूर यांच्या शेताजवळील कॅनलमध्ये त्यांनी बसवलेला लक्ष्मी कंपनीचा पाणबुडी विद्युत पंप व 100 फुट वायर दि. 03- 04.06.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विकास वाघमोडे यांनी दि. 05 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web