कळंब, रोसा येथे चोरीची घटना 

 
कळंब, रोसा येथे चोरीची घटना

कळंब: निखील भारत भडंगे, रा. कल्पना नगर, कळंब यांनी हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एस 2678 ही दि. 12.04.2021 रोजी 14.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर लावली असता ती मो.सा. त्यांना19.00 वा. सु. लावलेल्या ठिकाणी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या निखील भडंगे यांनी दि. 30 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा: परंडा तालुक्यातील रोसा शिवारातील रोसा- भोत्रा रस्त्यालगतच्या गट क्र. 1 मधील शासकीय मालकीचा 60 ब्रास मुरुम अज्ञात व्यक्तीने दि. 01.03.2021 रोजी 11.00 वा. चे पुर्वी चोरुन नेला आहे. यावरुन तलाठी- आकाश नागोराव वानखेडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 सह महाराष्ट्र जमीन महसुल कायदा कलम- 48 (7) (8) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे (Wanted) आरोपी ताब्यात

उस्मानाबाद -  पो.ठा. गु.र.क्र. 274/2020 भा.दं.सं. कलम- 381, 34 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- हनुमंत बाबुराव कवडे, वय 24 वर्षे, रा. देवळाली, ता. उस्मानाबाद हा पोलीसांना तपासकामी हवा होता. त्यास स्था.गु.शा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री निलंगेकर, पोहेकॉ- ठाकुर, धनंजय कवडे, पोना- दिपक लाव्हरेपाटील, पोकॉ- अशोक ढगारे यांच्या पथकाने आज दि. 1 मे रोजी देवळाली परिसरातून ताब्यात घेउन पुढील तपासकामी आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

From around the web