गुंजोटी, जवळे, वाघोली  येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

 मुरुम: दस्तातुर येथील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीच्या व्हरांड्याच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 22- 23.05.2021 दरम्यानच्या रात्री तोडून आतील फाल्‍कन कंपनीचा 6 अश्वशक्ती क्षमतेचा कुपनलीका पानबुडी विद्युत पंप चोरुन नेला. अशा मजकुराच्या ग्रामपंचायक कर्मचारी- गंगाधर तुकाराम इंगळे, रा. गुंजोटी, ता. उमरगा यांनी दि. 24 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा: दिनकर बिभीषन बडगणे, रा. जवळे (द.), ता. उस्मानाबाद यांनी एरंडगाव गट क्र. 21 मधील नातेवाईकांच्या शेतातील शेडमध्ये ठेवलेला 47 पोती हरभरा अज्ञात व्यक्तीने दि. 24.05.2021 रोजीच्या रात्री चोरुन नेला. अशा मजकुराच्या दिनकर वडगणे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद :  स्वप्नील रविंद्र कचरे, रा. उस्मानाबाद यांच्या वाघोली येथील तलावातील जलसिंचन विद्युत पंपाची 91 मिटर केबल अज्ञात व्यक्तीने दि. 22- 23.05.2021 दरम्यानच्या रात्री चोरुन नेली. अशा मजकुराच्या स्वप्नील कचरे यांनी दि. 24 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web