कोंड, उस्मानाबाद, ताकविकी येथे चोरी 

 
Osmanabad police

ढोकी : दिगबंर चव्हाण रा.कोंड हे दिनांक 30.06.2021 रोजी घराबाहेर झोपले असतांना पहाटे 05.00 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यासह शेजारी झोपलेल्या  लोकांचे चार स्मार्ट फोन अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : नेताजी गोरे रा.बार्शी नाका यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा दिनांक 29 जुन रोजी मध्यरात्री  अज्ञाताने उचकटुन घरातील देवघरामधील 500 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तु चोरुन नेल्या.अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन दिनांक 30 जुन रोजी  भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी: गणेश जाधव रा.ताकविकी यांच्या घराबाहेरील बोलेरो-पिकअप वाहन क्रमांक एम एच 25 पी 2369 हे दिनांक 26-27 जुन दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले.अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन दिनांक 30 जुन रोजी  भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.           

                                                                                  

From around the web