खडकी, तुगाव येथे चोरीची घटना 

जहागीरदारवाडी तांडा, नळखोरी तांडा येथे हाणामारी 
 
Osmanabad police

तामलवाडी: सिताराम मनसावले, रा. खडकी, ता. तुळजापूर यांच्या खडकी गट क्र. 54 मधील शेत विहीरीतील ॲम्को कंपनीचा पानबुडी विद्युत पंप दि. 19- 21.05.2021 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या सिताराम मनसावाले यांनी दि. 22 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी: भुजंग गणपती शेंडगे, रा. तुगाव, ता. उस्मानाबाद हे दि. 22.05.2021 रोजी 00.01 ते 04.00 दरम्यान राहत्या घराचा दरवाजा उघडा ठेउन झोपले होते. दरवाजा उघडा असल्याचा डाव साधून अज्ञात व्यक्तीने घरातील 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन स्मार्टफोन व 3,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या भुजंग शेंडगे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
दोन ठिकाणी हाणामारी 
 

  उस्मानाबाद - : जहागीरदारवाडी तांडा, ता. उस्मानाबाद येथील नवनाथ किसन राठोड यांसह 3 कुटूंबीय व गावकरी- किसन राजाराम चव्हाण यांसह 3 कुटूंबीय अशा दोन्ही कुटूंबाचा दि. 21.05.2021 रोजी रोजी 11.00 वा. सु. जहागीरदारवाडी तांडा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, चाकू, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नवनाथ राठोड व किसन चव्हाण यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 नळदुर्ग: जळकोट शिवारातील नळखोरी तांडा येथील सुनिल शामराव राठोड यांसह त्यांचे कुटूंबीय व अजय दत्तु चव्हाण यांच्यासह त्यांचे कुटूंबीय अशा दोन्ही गटांचा दि. 21 मे रोजी 21.00 वा. सु. वस्तीत आर्थिक व्यवहार व वडीलांस मद्याचे व्सन लावण्याच्या कारणांवरुन वाद झाला. यात दोन्ही गटांनी अवैध जमाव जमवून परस्परविरोधी गटांस शिवीगाळ करुन व ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुनिल राठोड व अजय चव्हाण यांनी परस्परविरोधी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

                                                                                  

From around the web