रुईभरमध्ये नवविवाहित महिलेची आत्महत्या 

 
Osmanabad police

बेंबळी - उस्मानाबाद तालुक्यातील रुईभरमध्ये एका नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला  कंटाळून आत्महत्या केली आहे.राधा अक्षय भोईटे असे या महिलेचे नाव आहे. 

राधा अक्षय भोईटे ( वय 21 वर्ष)   रा. रुईभर यांनी दि 23.06.2021 रोजी 11.00 वा घरातील छताला गळफास घेउन आत्महत्या केली होती. पती - अक्षय भोईटे, सासरे –गणपत, सासु- ईंदुबाई यांनी सुन-राधा हिचा वेळोवेळी  शारीरिक – मानसिक छळ केल्याने राधा हिने कंटाळुन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या राधाचे वडील शिवाजी कोळगे, रा. रुईभर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भादसं 306, 498 अ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

गुटखा बाळगणा-यावर गुन्हा दाखल 

 परंडा:  भाउबली कवडे यांनी दि 25 जुन रोजी  कपीलापुरी फाटा येथील आपल्या किराणा दुकानात महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गुटख्याच्या  373 पुडया बाळगल्याने  अनन्‍ सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांच्या  दिनांक 28 जुन रोजीच्या प्रथम खबरे वरुन भादसं 328, 188,272, 273, सह वाचन  अधि नियम अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

सार्वजनिक ठिकाणी रहदारीस धोका निर्माण करणाऱ्या दोन व्यक्तींवर गुन्हे दाखल

 मुरुम : रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने रस्त्यात वाहन  उभे करणा-याना मुरुम पोलीसांनी दि. 28 जून रोजी  भादसं कलम 283 अंतर्गत कारवाई केली. यात सुनिल जगदाळे यांनी  सुंदरवाडी येथे तर मारुती जाधव यांनी जेवळी येथे आपापल्या ताब्यातील ॲपे रिक्षा या रहदारीस धोका, अडथळा निर्माण होईल अशा रितीने रस्त्यावर  लावलेले असतांना मुरुम पोठाच्या पथकास आढळले.

From around the web