उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना 

 

तामलवाडी: धनाजी मनोहर वडवे, रा. वाणेवाडी, ता. तुळजापूर यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 6636 ही 23 मार्च रोजी 14.00 वा. वाणेवाडी येथील आपल्या शेतात लावली होती. ती मो.सा. त्यांना 17.00 वा. सु. लावलेल्या ठिकाणी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या धनाजी वडवे यांनी 24 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 परंडा: सुग्रीव कोंडीराम गणगे, रा. आसु, ता. परंडा हे 23- 24 मार्च दरम्यानच्या रात्री अयनापुर गट क्र. 42 मधील शेतातील घरासमोर स्मार्टफोन उशाला ठेउन झोपले होते. दरम्यान दिलीप पवार, लिंबराज काळे, अशोक पवार, तीघे रा. वारदवाडी, ता. परंडा यांनी तो स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुग्रीव गणगे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा: रागीणी विकास जगताप, रा. मुन्शी प्लॉट, उमरगा या 24 मार्च रोजी 15.00 वा. सु. मुन्शी प्लॉट येथील रस्त्याने घराकडे जात असतांना पाठीमागून एका मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी रागीणी जगताप यांच्या गळ्यातील 15 ग्रॅमचे सुवर्ण मंगळसुत्र हिसकावून पोबारा केला. अशा मजकुराच्या रागीणी जगताप यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : मनिषा नानासाहेब वाघमारे, रा. संभाजीनगर, उस्मानाबाद या 24 मार्च रोजी 11.45 वा. सु. राहत्या कॉलनीतील रस्त्याने पायी जात असतांना एका मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी मनिषा वाघमारे यांच्या गळ्यातील 18 ग्रॅमचे सुवर्ण मंगळसुत्र हिसकावून पोबारा केला. अशा मजकुराच्या मनिषा वाघमारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम: अश्विनी किरण खेमशेट्टी, रा. गुलबर्गा, राज्य कर्नाटक यांनी 18 मार्च रोजी 10.00 ते 15.30 वा. चे दरम्यान येणेगुर- गुलबर्गा असा रिक्षा व बसने प्रवास केला. दरम्यान त्यांच्या पिशवितील 4,35,000 ₹ किंमतीचे सुवर्ण दागिन्यांची पर्स अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अश्विनी खेमशेट्टी यांनी 24 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी: तानाजी व नंदु लिंबा माने, अमर विष्णु माने, बालाजी हरी माने, अविनाश बालाजी माने, सचिन माणिक माने, सर्व रा. तेर, ता. उस्मानाबाद यांनी 20 मार्च रोजी 11.30 वा. सु. मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेंच्या मुळेवाडी व थोडसरवाडी शिवारातील तेरणा जलाशयात मासेमारी करुन 200 कि.ग्रॅ. मासे चोरुन नेले. अशा मजकुराच्या मत्स्य व्यवसाय संस्था कर्मचारी- हनुमंत मारुती शिंदे यांनी 24 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भ.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web