शिरढोण : खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी ताब्यात

 
शिरढोण : खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी ताब्यात

उस्मानाबाद -  शिराढोन पो.ठा. गु.र.क्र. 143/2020 भा.दं.सं. कलम- 302, 307, 325, 324 या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी- गुल्या विठ्ठल काळे उर्फ सोन्या, रा. खडकवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर याचा पोलीस 1 वर्षांपासून शोध घेत होते. त्यास स्था.गु.शा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोना- दिपक लाव्हरेपाटील, अमोल चव्हाण, पोकॉ- अशोक ढगारे, पांडुरंग सावंत, आरसेवाड यांच्या पथकाने आज दि. 29 एप्रील रोजी शिताफीने व सापळारचून खडकवाडी परिसरातून ताब्यात घेउन पुढील कारवाईस्तव शिराढोन पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.  

सदोष मनुष्यवध प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

 उमरगा: महावितरनचे लाईनमन- भागवत राउत, रा. उमरगा यांनी विद्युत खांबावरील विजेचा प्रवाह खंडीत न करता उमरगा येथील बालाजी आनेप्पा बिराजदार यांना दि. 08.03.2021 रोजी 11.00 वा. सु. कुंभार पट्टी, उमरगा येथील खांबावर चढवून विद्युत वाहिनीचे काम करण्यास सांगीतले. यावर बालाजी बिराजदार हे खांबावरील विद्युत वाहिनीचे काम करत असतांना त्यांच्या शरिरातून विज प्रवाहित झाल्याने ते गंभीरजखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- चंद्रकला बालाजी बिराजदार यांनी अनैसर्गीक मृत्यु क्र. 19 /2021 फौ.प्र.सं. कलम- 174 च्या चौकशीत दिलेल्या लेखी जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 304 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 

From around the web