उस्मानाबाद जिल्ह्यात लैंगीक अत्याचार,अपहरण, मारहाण गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

उस्मानाबाद - जिल्ह्यातील एक 31 वर्षी महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 20.04.2021 रोजी 02.00 वा. सु. आपल्या घरी झोपलेली असतांना गावातीलच एका पुरुषाने तीला मारहाण करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केले. तसेच झाल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीला ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन पिडीतेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 354 (ड), 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण

उस्मानाबाद  जिल्ह्यातील एक 16 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) दि. 17 मे रोजी 15.00 वा. सु. तीच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाण

भूम: “तु म्हैसगावची शेतजमीन म्हैसगावच्या आमच्या सासुला का विकत नाहीस.” असे भूम येथील 1)अकबर पठाण 2)हमजा पठाण 3)रफिक पठाण 4)शाहीद पठाण यांनी दि. 16 मे रोजी 16.30 वा. सु. भुम येथील एमआयडीसी रस्त्यावर म्हैसगाव, ता. भुम येथील इलाही गैबी महाजन यांना धमकावून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या इलाही महाजन यांनी दि. 18 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी: वाशी येथील 1)रमेश साळुंके 2)संजय पवार 3)बजरंग पवार यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 14 मे रोजी 13.30 वा. सु. शिवशक्ती नगर, वाशी येथे गावकरी- नितीन महादेव साळुंके यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नितीन साळुंके यांनी दि. 18 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web