महिलेवर लैंगीक अत्याचार

 
महिलेवर लैंगीक अत्याचार

उस्मानाबाद- जिल्ह्यातील एक 30 वर्षी महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 11.04.2021 रोजी 11.00 वा. सु. शेताकडे चालत जात असतांना परजिल्ह्यातील एका तरुणाने अन्य तीघांच्या सहकार्याने तीला आपल्या  कारमध्ये बळजबरीने बसवून नेले. त्यांनतर त्या तरुणाने तीला श्रीगोंदा येथील लॉजवर व भिवंडी येथील एका घरात ठेउन तीला मारहाण करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केले. तसेच झाल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीच्या पतीसह तीला ठार मारण्यात येईल अशी धमकी दिली. यावरुन पिडीतेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तरुणासह त्याच्या तीन साथीदारांविरुध्द भा.दं.सं. कलम- 363, 379, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपहरण

उस्मानाबाद  जिल्ह्यातील एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 15 मे रोजी 13.00 वा. सु. शौचास गेली असता गावातीलच एका तरुणाने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरण केले. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

 उमरगा: चालक- समर्थ बाळु पाटोळे यांनी दि. 15 मे रोजी 18.00 वा. सु. खसगी शिवारातील पेट्रोलियम विक्री केंद्राजवळील रस्त्यावर मोटारसायकल क्र. के.ए. 32 इएन 4684 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून पायी जाणाऱ्या शिवपुत्र गुरुनाथ जगदे, रा. किनी सुलतान, ता. आळंद, राज्य- कर्नाटक यांना पाठीमागून धडक दिल्याने शिवपुत्र यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले. अशा मजकुराच्या शिवपुत्र जगदे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

 कळंब: मोहा, ता. कळंब येथील संजय व ऋत्वीक संजय मडके या दोघा पिता- पुत्रांनी शेत नांगरणीच्या कारणावरून दि. 15 मे रोजी 11.30 वा. सु. कुंभारवस्ती, मोहा येथे गावकरी- संपत शिवराव कसबे यांसह त्यांचा भाऊ- भागवत यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संपत कसबे यांनी दि. 17 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web