उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे सात गुन्हे दाखल 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे सात गुन्हे दाखल

शिराढोण: रमेश सोपानराव काळे, रा. आवाड शिवपुरा ता. कळंब हे  19 एप्रिल रोजी 17.00 वाजता शेतात होते. यावेळी भावकीतील उत्तरेश्वर, कालिंदा, रागीनी काळे यांनी रमेश यांना उसाला पाणी देण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन दगडाने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रमेश काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : गणेश बालाजी राठोड, रा. उस्मानाबाद हे 19 एप्रिल रोजी 20.15 वाजता शेतात गेले असता तेथे भाउबंद- तुकाराम, अमर व गावकरी- दिनेश, उमेश जाधव हे गणेश यांच्या शेतातील माती घेउन जात होते. यावेळी गणेश यांनी त्यांना माती घेउन जाउ नका असे म्हणताच त्यांनी गणेश यांना  शिवीगाळ करुन दगड व काठीने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली.  अशा मजकुराच्या गणेश राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 येरमाळा: सुरेखा चंद्रशेन मुंडे, रा. उपळाई ता. कळंब हे  पतीसह  19 एप्रिल रोजी 12.00 वाजता शेतात होते. यावेळी भावकीतील बळीराम बारीक मुंडे यांनी सुरेखा यांना शेतात दगड टाकण्याचे वादातुन शिवीगाळ करुन खो-याने मारुन जखमी केले. तसेच सुरेखा यांच्या पतीस ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुरेखा मुंडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 324, 504, 506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा: सोमनाथ-सुरेश माळी, रा. माणकेश्वर ता. भुम हे दोघे भाउ 18 एप्रिल रोजी 20.30 वाजता शेताकडे जात होते. यावेळी गावकरी- अशोक, मंजुशा, विजय, राजुबाई यादव,  यांनी सोमनाथ व सुरेश यांना बांध फोडण्याचे कारणावरुन  शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच कु-हाडीचे दांडयाने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली.  अशा मजकुराच्या सोमनाथ माळी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 शिराढोण: मुनीर दिल्लु सय्यद, रा. वाटवडा  ता. कळंब हे  18 एप्रिल रोजी 11.00 वाजता शेतात होते. यावेळी गावकरी समीर सलीम बेग यांनी मुनीर यांना हौदामध्ये पाणी भरण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन कु-हाडीने मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या मुनीर सय्यद  यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 326, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा: मंजुशा अशोक यादव, रा. माणकेश्वर ता. भुम हे 18 एप्रिल रोजी 20.30 वाजता पती-मुलासह घरासमोर होते. यावेळी गावकरी-सोमनाथ, सुरेश, हिरकन, सुनिता, सारीका, संदीप, परसु माळी, यांनी मंजुशा यांना बांध फोडण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन चप्पलने मारहाण केली. तसेच पती-अशोक, मुलगा-सुशांत यांना लाथाबुक्यांने मारहाण केली.  तसेच ठार मारण्याची धमकी दिली.  अशा मजकुराच्या मंजुशा यादव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 143, 147, 149, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद :  डॉ.आरुण मोरे, रा. उस्मानाबाद हे 18 एप्रिल रोजी 13.00 वाजता कोर्ट आदेशाने आपले मुलांना भेटण्यास जुने रेल्वे स्टेशन येडशी येथे गेले होते. यावेळी पत्नी-डॉ. कांचन मोरे, प्रथमेश मोहीते व ईतर दोन रा. येडशी यांनी मिळुन आरुण यांना शिवीगाळी केली व लाथाबुक्यांने मारहाण केली.  तसेच गळा आवळुन ठार मारण्याचा प्रयत्न केला.  अशा मजकुराच्या डॉ. आरुण मोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 307, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 कळंब: अमोल राजाभाउ गुरसाळे, रा. बुरुड गल्ली, कहंब यांनी 19 एप्रील रोजी 18.21 वा. आपले किराणा दुकान व्यवसायास चालू ठेवुन कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची घातक कृती करुन भा. दं. सं. कलम- 188 उल्लंघन केले. 

चोरी

 बेंबळी: अंकुश दिनकर काळे, रा. बोरगांव (राजे) यांच्या घराचे कडी-कोंडा 18-19 एप्रिल दरम्यानच्या रात्री अज्ञाताने तोडुन घरातील 17 ग्रॅम सोन्याचे, 6 तोळे चांदीचे दागीने व 4 मोबाईल चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.                                       

                                                                                   

From around the web