सावरगाव : चोरीच्या बुलेट सह तीन आरोपी ताब्यात

 
सावरगाव : चोरीच्या बुलेट सह तीन आरोपी ताब्यात

उस्मानाबाद -  सावरगाव, ता. तुळजापूर येथील 1)अजीम सय्यद 2)अमर चव्हाण 3)रोहन मस्के हे तीघे  गेल्या काही दिवसांपासून एक बुलेट मोटारसायकल संशयास्परित्या बाळगुन आहेत.  अशी गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पोनि-  गजानन घाडगे यांच्या नेतृत्वाखालील सपोनि मनोज निलंगेकर, पोहेकॉ- साळुंके, धनंजय कवडे, पोकॉ- पांडुरंग सावंत, अशोक ढगारे यांच्या पथकास मिळाली होती. यावर पथकाने दि. 13.05.2021 रोजी नमूद तीघांना संबंधीत मोटारसायकलसह ताब्यात घेउन मो.सा. च्या नोंदणी कागदपत्रे, मालकी- ताबा या विषयी विचारले असता त्या तीघांनी समाधानकारक माहिती दिली नाही.

यावर पथकाने बुलेट मो.सा. चा सांगाडा व इंजीन क्रमांकाच्या सहायाने तांत्रीक शोध घेतला असता ती मोटारसायकल तामलवाडी पो.ठा. हद्दीतून चोरीस गेल्यावरुन गु.र.क्र. 52 / 2021 भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल असल्याचे समजले. यावरुन नमूद तीघांना मो.सा. सह ताब्यात घेउन त्यांना तामलवाडी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

From around the web