सांगितले आयएएस अधिकारी , निघाला सुशिक्षित बेकार ... 

फसवणूक झालेल्या वधू  मुलीची उस्मानाबाद पोलीस स्टेशनमध्ये धाव 
 
सांगितले आयएएस अधिकारी , निघाला सुशिक्षित बेकार ...

उस्मानाबाद -    वर मुलगा आयएएस अधिकारी असल्याचे सांगून विवाह केला तर निघाला सुशिक्षित बेकार, त्यामुळे वधू मुलीने उस्मानाबाद पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, वधूच्या तक्रारीवरून वर मुलासह  चार जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोहारा येथील 1)विश्वास विजयकुमार झिंगाडे 2) विजयकुमार झिंगाडे 3)विनोदीनी झिंगाडे, तीघे रा. लोहारा 4)वसुंधरा भागानगरे, रा. पुणे या सर्वांनी श्रेया दत्तात्रय कठारे उर्फ श्रेया विश्वास झिंगाडे, रा. उस्मानाबाद यांना विश्वास झिंगाडे हे आयएएस अधिकारी असल्याचे बतावणी करुन विश्वास व श्रेया यांचा विवाह घडवला. अशा प्रकारे त्यांनी सन- 2019- 21 या काळात श्रेया यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या श्रेया कठारे यांनी दि. 13 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम419, 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अपहरण

उस्मानाबाद - जिल्ह्यातील एक 15 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 12.05.2021 रोजी 23.00 वा. सु. तीच्या राहत्या घरी असतांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आजीने दि. 13 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

उस्मानाबाद  - : वसिम चाँद शेख, रा. शाहुनगर, उस्मानाबाद हे आपल्या हरवलेल्या म्हशीचा शोध घेत दि. 12 मे रोजी 19.30 वा. सु. उस्मानाबाद येथील सुरज पवार यांच्या शाहुनगर येथील शेतात आले असता सुरज यांसह सटवा, पोत्या अशा तीघांनी “तुम्ही आमच्या गोठ्यासमोर पुन्हा- पुन्हा का येता.” असे वसिम शेख यांना धमकावून वसिम यांसह त्याचा भाऊ- मोसीन यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या वसिम शेख यांनी दि. 13 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web