कोविड रोग प्रसाराची शक्यता निर्माण करणाऱ्या दोघांस आर्थिक दंडाच्या शिक्षा

 
Osmanabad police

 परंडा - पो.ठा. हद्दीत निष्काळजीपनाच्या कृतीद्वारे कोरोना प्रसाराची शक्यता निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन करणाऱ्या ऋषीकेश नवनाथ जानकर व दत्तात्रय पंढरी केमदारने या दोघांना अनुक्रमे 1,000 ₹ व 2,000 ₹ दंडाची  शिक्षा आज दि. 21 ऑगस्ट रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी सुनावली आहे.


कोरोना संसर्ग होण्याची निष्काळजीपणाची  कृती करणाऱ्यवर गुन्हा दाखल

परंडा : कोविड- 19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जारी आदेश झुगारुन चिंचपूर, ता. परंडा येथील शरद अरुण देवकर हे नाका- तोंडास मास्क न लावता दि. 20 ऑगस्ट रोजी 10.00 वा. सु. परंडा न्यायालयाच्या आवारात फिरत असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोकॉ- आण्णासाहेब लोमटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम  खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदला आहे.

 
सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

तामलवाडी  : निळोबा अरुण गायकवाड, रा. तामलवाडी यांनी दि. 20 ऑगस्ट रोजी 14.00 वा. सु. तामलवाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोरील सार्वजनिक रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 5742 ही रहदारीस धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपने भर रस्त्यात उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असतांना तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web