उस्मानाबादच्या इंजिनियरची भामट्याकडून फसवणूक 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  -  “बॅंकेला  तुमच्या खात्याची  केवायसी करायची असुन  24 तासात केवायसी  (ग्राहकाची खातरजमा) न केल्यास तुमचे बँक खाते बंद होईल, असा लघुसंदेश पाठवून एका भामट्याने  पंचायत समितीचे सेक्शन इंजिनियरची ६० हजराची फसवणूक केली. 


उस्मानाबाद पंचायत समितीचे सेक्शन इंजिनियर नारायण शिंदे यांच्या  मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल  धारकाने  दिनांक 03 जुलै रोजी लघुसंदेश  करुन “बॅंकेला  तुमच्या खात्याची  केवायसी करायची असुन  24 तासात केवायसी  (ग्राहकाची खातरजमा) न केल्यास तुमचे बँक खाते बंद होईल. याकरीता तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या  पानाचे छायाचित्र पाठवा. 

 यावर शिंदे यांनी सारासार विचार न करता त्या अज्ञातावर विश्वास ठेवुन आपल्या बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाचे छायाचित्र त्यास पाठवले. त्यानंतर शिंदे यांच्या भ्रमणध्वनीवर एक लघुसंदेश आला असता शिंदे यांनी तो संदेश वाचुन समजुन न घेता त्यातील गोपनीय ओटीपी क्रमांक त्या अज्ञाताने विचारला असता  सांगितला असता शिंदे यांच्या बॅक खात्यातुन 60,000 रु रककम अन्यत्र स्थलांतरीत झाली.

अशा मजकुराच्या नारायण शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 420, 66 (सी) (डी) कायदा  अंतर्गत गुन्हा नोदंविला आहे.


दोन ठिकाणी चोरी 

नळदुर्ग : राजु अण्णाप्पा ईटकर, रा. देशमुख वस्ती, अणदुर यांनी ट्ऱक क्रमांक एम एच 13 ए एक्स 4132 ही देशमुख वस्तीजवळील  महामार्गाच्या  सर्व्हीस रोडवर लावली होती. दरम्यान दिनांक 03 जुलै रोजी रात्री 02.00 वा स्वीफट डीझायर कार क्रमांक एम एच 13 सी यु 5121 मधुन आलेल्या अज्ञात तीन चोरटयांनी ट्रकच्या  इंधन टाकीतील 300 लीटर डीझेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : कवठा येथील निळकंठ सोनवणे हे दिनांक 01 जुलै रोजी दुकानाचे दार अर्धवट उघडे ठेवुन आत झोपले होते. मध्यरात्री 00.30 वा. सुमारास अज्ञाताने दुकानात प्रवेश करुन निळकंठ यांच्या उशाखालील एक लाख रुपये रककम चोरुन नेली.अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन दिनांक 03 जुलै रोजी  भा.दं.सं. कलम-  380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web