लोहाऱ्यातील शेतकऱ्याची ऑनलाईन फसवणूक

भामट्याने  हातोहात एक लाख रुपये दुसऱ्या खात्यावर स्थलांतरीत केले 
 
Osmanabad police

लोहारा: मोघा, ता. लोहारा येथील धनराज बब्रुवान जाधव हे दि. 17 मे रोजी शेतात काम करत होते. यावेळी त्यांच्या भ्रमणध्वनीवर एका अज्ञाताने संपर्क साधून क्रेडीट कार्डची उधारी मर्यादा वाढवून देण्याचे आमिष दाखवले. यावर त्याने विचारल्याप्रमाणे जाधव यांनी आपल्या क्रेडीट कार्डवरील अंक, नाव इत्यादी माहिती त्यास सांगीतली असता जाधव यांच्या भ्रमणध्वनीवर एक लघु संदेश आला. 

जाधव यांनी या संदेशातील मजकुरा वाचून समजावून न घेता त्यातील गोपनीय ओटीपी त्या समोरील अज्ञातास सांगीतला. या माहितीच्या आधारे समोरील त्या अज्ञाताने जाधव यांच्या बँक खात्यातील 99,608 ₹ रक्कम ऑनलाईन पध्दतीने अन्यत्र स्थलांतरीत केली. अशा मजकुराच्या धनराज जाधव यांनी दि. 19 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (ड) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीचे दोन गुन्हे दाखल 

उमरगा: कराळी तांडा, ता. उमरगा येथील गोविंद बद्दु चव्हाण यांसह कुटूंबातील विकास, कैलास, सतिष, मारुती यांचा गावातीलच राजु मनोहर चव्हाण यांसह कुटूंबातील रोहीदास, मनोहर, नेताजी, सविता, कविताबाई, मोठाबाई यांच्यात रहदारीच्या व किरकोळ कारुणावरुन दि. 18.05.2021 रोजी 19.30 ते 21.30 वा. चे दरम्यान राहत्या गल्लीत वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही कुटूंबीयांतील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांस शिवीगाळ करुन दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच गोविंद चव्हाण यांच्या गटातील सदस्यांनी राजु चव्हाण यांच्या गाडीवर दगड मारुन नुकसान केले. अशा मजकुराच्या गोविंद चव्हाण व राजु चव्हाण यांनी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन परस्परविरोधी 2 गुन्हे नोंदवले आहेत.

शिरढोण :  कळंब येथील 1)विशाल खरमुडे 2)अरबाज बागवान 3)शाहीद शेख 4)अनिल अरखडे यांसह अनोळखी 4 व्यक्तींनी दि. 15.05.2021 रोजी 22.00 वा. सु. भाटशिरपुरा शिवारातील ‘शिवशाही रसवंती व हॉटेल’ समोर बेकायदेशीर जमाव जमवून पाणी बाटल्या व वापरा आणि फेका चे पेले न दिल्याच्या कारणावरुन हॉटेल मालक- बालाजी गोरोबा जाधव, रा. भाटशिरपूरा, ता. कळंब यांसह त्यांचा मुलगा- सुयेश व ओमकार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बालाजी जाधव यांनी 19 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुने भा.दं.सं. कलम- 141, 143, 147, 148, 149, 323, 325, 326, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web