उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार, एक जखमी 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक ठार, एक जखमी

येरमाळा : चालक-फिरोज शेख व शब्बीर याळवार, दोघे रा. ताजबावडी, बिजापुर हे आपले ट्रक क्र. के. ए. 26 ए 4640 हे  घेउन जात होते. यावेळी ट्रक क्र. के. एल. 58 आर 3228 चे चालक- नितीन वेणुगोपाल रा. मेलठ राज्य केरळ याने आपले वाहन निष्काळजीपणे चालवुन फिरोज यांच्या ट्रकला धडक दिली. या अपघातात शब्बीर व फिरोज असे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या शब्बीर याळवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 279, 337, 338 आणि मो. वा. का. कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 शिराढोण : विलास गोविंद राठोड वय 28 वर्ष रा. अस्वलांबा ता. अंबाजोगाई हे 10 एप्रिल  रोजी 22.30 वा. सु. घारगांव शिवारातुन मोटार सायकल क्र. एम. एच. 25 एआर 4166 ने वांजरखेडा येथे जात होते. या वेळी अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन हे निष्काळजीपणे, बेदरकारपणे चालवून विलास यांच्या मो. सा. ला  धडक दिली. या अपघातात विलास हे  गंभीर जखमी होवुन मयत झाले. अशा मजकुराच्या ज्योती राठोड यांनी 11 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 279, 337, 338, 304 अ, सह मो. वा. का. कलम-  184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 


अवैध मद्य विरोधी कारवाई

भुम : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन भुम पोलीसांनी  11 एप्रील रोजी 17.30 वा. गांधी चौक, भुम  येथे छापा टाकला असता हर्षवर्धन संजय लोंढे, रा. भुम, हे अवैध विक्रीच्या उद्देशाने विदेर्शी बिअरच्या 5 बॉक्स जवळ बाळगला असतांना आढळला.

 उमरगा : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उमरगा पोलीसांनी  11 एप्रील रोजी 17.15 वा. एकोंडी शिवार येथे छापा टाकला असता भिमय्या नागय्या तेलंग, रा. एकोंडी  हे अवैध विक्रीच्या उद्देशाने 22 लिटर गाहभ दारु जवळ बाळगला असतांना आढळला.

From around the web