मुरूम : आत्महत्येस प्रवृत्त करणा-यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

 मुरुम: श्रीमती सुकुमार काशीनाथ जंगाले (जाधव), रा.कोराळ यांनी दिनांक 26 जुन रोजी दुपारी आपल्या  घरातील छताला गळफास घेउन आत्महत्या केली होती. पती – काशीनाथ विश्वनाथ जंगाले, सासु- विमल, जाउ– जनाबाई  यांनी सुकुमार  हिचा वेळोवेळी  शारीरिक – मानसिक छळ केल्याने तिने कंटाळुन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या भारबाई भिमराव कदम, रा. कानेगाव, ता.लोहारा यांनी अकस्मात म्रत्यु  चौकशी दरम्यान दिलेल्या निवेदनावरुन दि. 01 जुलै रोजी  भादसं 306, 498 अ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक 

नळदुर्ग: श्रीकांत पोतदार रा.अनदुर यांनी त्यांची कार गावकरी मित्र-साहेबलाल शेख यांना वापरास दिली होती. दरम्यान श्रीकांत यांचा मृत्यु झाल्याने त्यांची  पत्नी श्रीमती वर्षीता यांनी साहेबलाल यांना  वेळोवेळी ती कार परत करण्यास सांगितले असता साहेबलाल यांनी ती कार परत करण्यास नकार दिला.

अशा मजकुराच्या श्रीमती वर्षीता पोतदार  यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 409 अंतर्गत गुन्हा नोदंविला आहे.

चोरीचे दोन गुन्हे 

उमरगा : अनिकेत हिराळे रा. उमरगा  हे आजी काशिबाईसह दिनांक 01 जुलै रोजी शहरातील एका बँकेतुन घराकडे परतत असतांना त्यांनी  अनेक ठिकाणी आपली मोटार सायकल उभी केली होती. या दरम्यान त्यांच्या मोटार सायकलच्या डिकीतील एक लाख रुपये अज्ञाताने चोरले. अशा मजकुराच्या काशीबाई  यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

तुळजापूर : विजय ढेकरे रा.काक्रंबा हे दिनांक 01 जुलै रोजी 12.15 वा लातुर – तुळजापूर रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागुन आलेल्या  होंडा युनिकॉर्न क्रमांक एम एच 24 झेड 0881  वरील  दोन अज्ञात पुरुषांनी ढेकरे यांना आडवुन त्यांच्या हातातील स्मार्ट फोन व खिशातील दोन हजार रुपये रककम लुटुन नेली. अशा मजकुराच्या  ढेकरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

From around the web