मागील कुरापतीवरून भूम तालुक्यात एकाचा खून 

 
Osmanabad police

भूम -  देवळाली, ता. भुम येथील बजरंग बिभिषन तांबे, वय 39 वर्षे हे बेपत्ता असल्यावरुन भुम पो.ठा. येथे 3 / 2021 ही मिसिंग दि. 22.05.2021 रोजी नोंद असुन पोलीस त्यांचा शोध घेत होते. तपासादरम्यान दि. 02.06.2021 रोजी 11.30 वा. आरसोली शिवारातील शेतात बजरंग तांबे यांचा मृतदेह पोलीसांना आढळुन आला. 

याप्रकरणी मयताची आई- हिराबाई बिभीषन तांबे, रा. देवळाली यांनी लेखी निवेदन दिले की, “ओमकार गौतम चव्हाण, रा. देवळाली याने पुर्वीच्या तक्रारीचा राग मनात धरुन बजरंग तांबे यास जिवे ठार मारुन त्याचा मृतदेह एका पोत्यात बांधुन टाकला आहे.” यावरुन भुम पो.ठा. येथे ओमकार चव्हाण याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 302, 201 अंतर्गत गुन्हा भुम पो.ठा. येथे नोंदवला आहे.

हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

 येरमाळा: वाघोली, ता. कळंब येथील 1)विजय चंद्रकांत कदम 2)चंद्रकांत कदम 3)मिराबाई कदम हे तीघे पुर्वीच्या भांडणाच्या कारुणावरुन दि. 29.05.2021 रोजी 11.30 वा. सु. गावकरी- कालीदास कदम यांना मारहान करत होते. यावेळी कालीदास यांच्या बचावास त्यांचा मुलगा- रामराजे हे आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच रामराजे यांच्या भ्रमणध्वनीवर संदेशाद्वारे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रामराजे कदम यांनी दि. 02 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 507, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद - बोंबले हनुमान, उस्मानाबाद येथील 1)भावेश काशीद 2)नाना राउत 3)दिपाली राउत 4)बंटी राउत 5)गुड्डी राउत 6)आदित्य राउत या सर्वांनी संगणमताने, “तुम्ही मालकाला रस्ता का मागीतला.” असे कारण काढून गल्लीतील- धर्मा हराळे यांसह त्यांची पत्नी- रतन, मुलगा- आदित्य यांना दि. 01 जून रोजी 12.30 वा. सु. राहत्या गल्लीत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रतन हराळे यांनी दि. 02 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग: जगन्नाथ उत्तम शिंदे, रा. बसवंतवाडी, ता. तुळजापूर हे दि. 30.05.2021 रोजी 17.00 वा. सु. आपल्या शेत गट क्र. 292 मध्ये गेले होते. यावेळी गावकरी देडे कुटूंबातील- शाम, सुरेखा, अमर, लक्ष्मण, दिव्या, सेसाबाई, आवडाबाई, मछिंद्र, राम असे नऊजण जगन्नाथ शिंदे यांच्या शेतात बांधकाम करत असल्याचे शिंदे यांना दिसले. यावर जगन्नाथ शिंदे यांनी त्यांना बांधकाम करण्यास अडवले असता नमूद सर्वांनी संगणमाताने शिंदे यांसह त्यांचा भाचा- मनोज मोरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच शिंदे यांच्या शेतात मशागतीस असलेल्या ट्रॅक्टरवर दगड मारुन नुकसान केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या जगन्नाथ शिंदे यांनी दि. 02 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504, 427, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web