शेतीच्या वादातून एकाचा खून 

 
Osmanabad police

तुळजापूर: आकाश दगडु सोनटक्के ,वय 28 वर्षे, रा.उजणी,ता. औसा यांचा मृतदेह तुळजापुर- बार्शी टी जक्शनकडे दरम्यान घाटाच्या झाडी-झुडपांत मोटारसायकलसह आढळला होता. केळगाव,ता. निलंगा येथील विवेकानंद उर्फ अनिल  व जयराम शिवराम काळे, यांनी दि. 03 ते 06.07.2021 रोजी दरम्यान आकाश यास फोन करुन बोलावुन घेतले.

 वडीलोपार्जीत जमीन नावावर करुन देण्याच्या वादातुन   त्यांनी  आकाशला मारहाण केल्याने त्याचा  मृत्यु झाला आहे. अशा मजकुराच्या वडील दगडु सोनटक्के यांनी  अकस्मात मृत्यु चौकशी दरम्यान दि. 06 जुलै रोजी दिलेल्या निवेदनावरुन भादसं  302, 365, 201, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

गुटखा बाळगणा-यावर गुन्हा दाखल

शिराढोण :सलमानखॅा शेरखॉ पठाण, रा.राजंणी ता.कळंब, ईफत किराणा स्टोअर्स येथे दिनांक 03.07.3021 रोजी 11.00 वा शिराढोण पोलीसांनी छापा टाकला असता 4,422 रुपये किमतीचा गुटखा  हा प्रतिबंधीत अन्न  पदार्थ  आढळला होता. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्य अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी  दिं. 06.07.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं 328, 188,272, 273, सह वाचन  अधि नियम अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे

फसवणूक 

उस्मानाबाद  - उस्मानाबाद नगर परिषद कार्यालयातील घर क्रमांक 27/85 च्या  संचिकेतील कागदपत्रांत  अज्ञाताने सन 2001 ते 2017 या काळात  लपुन छपुन  अतिरिक्त मजकुर लिहुन मुळ लिखाणात फेरफार केला. या प्रकरणी नगर परिषद लिपीक सादीक बागवान यांनी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन  भादसं 420,465, 468  अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

अतिक्रमण

कळंब: मिरा देशपांडे रा.पुणे यांच्या मालकीचा सावरगांव (पुनर्वसन)येथे असलेल्या भुखंडावर शिवाजी नगर कळंब  येथील  विनायक माने  यांनी  दिनांक 02 जुलै पुर्वी कुंपण  करुन  अतिक्रमण  केले  आहे.अशा मजकुराच्या मिरा देशपांडे  यांनी  दिले प्रथम खबरे वरुन  मिरा देशपांडे  यांनी भादसं 447  अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

From around the web