कंडारीत शेतीच्या वादातून एकाचा खून 

 

आंबी: ईश्वर व परमेश्वर ज्ञानबा देशमुख या दोघा बंधुंसह संभाजी भागवत देशमुख, तिघे  रा. कंडारी, शहाजी दगडु मोटे, रा. गिरवली, गंगुबाई बळीराम भोसले, रा. जेजला, ता. भुम अशा पाच जणांचा जेजला ग्रामस्थ -बळीराम जगन्नाथ भोसले, वय 55 वर्षे यांच्याशी शेतजमीनीच्या कारणावरुन पुर्वापार वाद आहे. 

या वादातून नमूद 5 व्यक्तींनी बळीराम भोसले यांना 13 व 14 मार्च रोजी जेजला शिवारात लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. त्यानंतर बळीराम भोसले यांना त्यांच्याच घरात दोरीने बांधून ठेउन डांबून गंभीर मारहाण करुन त्यांचा खून केला. असे निवेदन मयताचे नातेवाईक- कालीदास चंद्रकांत भोसले यांनी आंबी पो.ठा. अनैसर्गीक मृत्यु क्र. 06 / 2021 फौ.प्र.सं. कलम- 174 च्या चौकशीत 15 मार्च रोजी दिल्याने नमूद 5 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 302, 342, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारीचे सहा गुन्हे दाखल 

 परंडा: पिंपळवाडी, ता. परंडा येथील स्वाती घुबे, विक्रम घुबे, पवन घुबे, हनुमंत गायकवाड अशा चौघांनी भुखंडाच्या पुर्वीच्या वादावरुन 14 मार्च रोजी 21.00 वा. सु. राहत्या गल्लीत गावकरी- छाया चंद्रकांत गायकवाड यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. आईच्या बचावास आलेल्या नितीन गायकवाड यांसही नमूद चौघांनी शिवीगाळ करुन मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या छाया गायकवाड यांनी 15 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी: टाकळी, ता. उस्मानाबाद येथील महादेव सुर्यवंशी यांच्या घरासमोर 14 मार्च रोजी 21.00 वा. सु. काही लोकांत जनावरे बांधण्याच्या कारणावरुन वाद चालू होता. यावेळी गावकरी- महादेव सुर्यवंशी यांच्यासह तीघा भावांनी तो वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता तेथे उपस्थित असलेल्या गावकरी- विश्वास व राजाराम विठ्ठल गरड या दोघा भावांनी तीघा सुर्यवंशी बंधुंना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली व चावा घेउन जखमी केले. अशा मजकुराच्या महादेव सुर्यवंशी यांनी 15 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : धारासुर मर्दिनी मंदीर जवळ, उस्मानाबाद येथील गणेश पांडुरंग सुरवसे यांना पुर्वीच्या वादावरुन 13 मार्च रोजी 23.30 वा. सु. राहत्या गल्लीत गल्लीतीलच- मयुर महादेव वाळले यासह दादा रवि वाळले, रा. काकानगर व अन्य दोन व्यक्ती यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गणेश सुरवसे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : सुशिला नगर, उस्मानाबाद येथील जुबेर शेख, अलताफ शेख, सलमान शेख अन्य व्यक्तींसह 11 मार्च रोजी 20.00 वा. सु. गल्लीतीलच विकास विश्वनाथ कोकाटे यांच्या घरासमोर मोठमोठ्याने आरडाओरड करुन गोंधळ करत होते. यावेळी विकास कोकाटे यांनी घराबाहेर येउन गोंधळ न घालण्यास सांगीतले असता नमूद तीघांनी त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दगड फेकून मारल्याने ते जखमी झाले. अशा मजकुराच्या विकास कोकाटे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी विनेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 वाशी: पिंपळगाव (लिंगी), ता वाशी येथील शंकर व विजय शंकर कोल्हे हे दोघे पिता- पुत्र 15 मार्च रोजी आपल्या शेतातील गोठ्यासमोर होते. यावेळी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन भाऊबंद- काकासाहेब कोल्हे, आबासाहेब कोल्हे, गणेश कोल्हे या तीघांनी नमूद पिता- पुत्रांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शंकर कोल्हे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी: राजुरी, ता. उस्मानाबाद येथील श्रीमती सविता बालाजी देडे यांच्यासह 7 सदस्यांच्या गटाचा गावकरी- सिराज रशीद सय्यद यांसह 8 सदस्यांच्या गटाशी 14 मार्च रोजी 21.00 वा. कचरा फेकणे व मजुरी रक्कम या कारणातून वाद झाला. यात दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या परस्परविरोधी दोन तक्रारीवरुन दोन्ही गटांविरुध्द भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 326, 504 अंतर्गत दोन गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web