उमरगा तालुक्यात वृद्ध इसमाचा खून 

 
उमरगा तालुक्यात वृद्ध इसमाचा खून

उमरगा : थोरलीवाडी ता.उमरगा येथील तुकाराम भिमा खवडे, वय 85 वर्षे, यांचा मृतदेह दि. 07/04/2021 रोजी 19.00 वा. थोरलीवाडी शिवारातील विहीरीत आढळला होता. गावकरी- दत्तु भानुदास चिंचोळे यांसह 17 पुरुषांनी तुकाराम यांना ठार मारुन त्यांचे प्रेत विहीरीत टाकले आहे. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा व्यंकट यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं.कलम 302, 201 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

 कळंब : दिपक दत्तात्रय कोकाटे, रा. हावरगाव  हे दि. 08.04.2021 रोजी 07.00 वा. घरासमोर होते. यावेळी भाऊ- आगरचंद व पुतण्या अनिकेत या दोघा पिता-पुत्रांनी मिळुन जुन्या भांडणाच्या कारणावरुन दिपक यांना शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन प्लॅस्टिक नळी व बांबुने मारहाण केली. तसेच दिपक यांच्या पत्नीस धक्काबुक्की केली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं.कलम 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरी

तामलवाडी : मसला (खु) ता. तुळजापुर येथील गोरख बाबुराव लोहार यांची पॅशन मो. सा. क्र. एम. एच. 13 एजी 3509 ही 04 एप्रिल रोजी गावातील गट क्र. 440 मधील शेतातुन 11.00 वा. अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या गोरख यांनी दि. 05 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं.कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 फसवणुक

उस्मानाबाद : काजळा ता.उस्मानाबाद येथील अश्रुबा शंकर माळी, वय 25 वर्षे, यांच्या बँक खात्याच्या धनादेशाची 4 पुस्तके असे एकुण 80 धनादेश सुमित सुरेंद्र तडवहा, संजय बापु आडागळे, दोघे रा. वाडगाव, विलास बाळासाहेब शाळ, रा. भुम, महादेव कवडे, रा. बावी यांनी मे 2020 ते 5.4.2021 दरम्यान चोरले. या धनादेशांवर त्यांनी अश्रुबा यांच्या खोटया  सहया करुन  ते धनादेश लोकांना वितरीत केले. अशा मजकुराच्या अश्रुबा यांनी दि. 08 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं.कलम 420, 467, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web