करजखेडयात किसानवाडा ढाब्यावरील वेटरचा खून 

ढाबा मालक आणि त्याच्या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल 
 
करजखेडयात किसानवाडा ढाब्यावरील वेटरचा खून

बेंबळी: उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील एका ढाब्यामध्ये काम करणाऱ्या वेटरला मालक आणि त्याच्या मुलाने बेदम  मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट  करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बेंबळी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

करजखेडा येथील ‘किसानवाडा ढाबा’ येथे  गुणवंत सिध्दलिंग पेंडपाले, वय 35 वर्षे, रा. गणेशनगर, औसा, लि. लातूर (ह.मु. करजखेडा) हा वेटर म्हणून कामास होता. हा ढाबा उस्मानाबाद येथील महादेव नारायण सुरवसे यांच्या मालकीचा आहे. 

 दि. 15मे रोजी सायंकाळी सहा वाजता  करजखेडा गट क्र. 89 मधील शेतात महादेव सुरवसे यांसह भैय्या महादेव सुरवसे या दोघांनी अज्ञात कारणावरुन गुणवंत पेंडपाले यास बेदम  मारहाण करुन त्यांचा खून केला व गुणवंत यांचा मृतदेह अन्य ठिकाणी नेवून  पुरावा नष्ट केला. 

या प्रकरणी  मयताची पत्नी- योगिता पेंडपाले यांनी दि. 16 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पोलिसांनी   महादेव सुरवसे आणि भैय्या महादेव सुरवसे विरुद्ध भा.दं.सं. कलम- 302, 201, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web