लोहारा : लघुशंकेसाठी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने  धडक दिल्याने एकाचा मृत्यू 

 
लोहारा : लघुशंकेसाठी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू

लोहारा: शिवाजी सिताराम सगर, वय 50 वर्षे, रा. औसा, जि. लातूर व त्यांचा मुलगा- आकाश सगर हे दोघे दि. 10.03.2021 रोजी 09.00 वा. सु. करजगाव शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. ने प्रवास करत होते.

 दरम्यान चिरकापाटी येथे ते दोघे पिता- पुत्र लघुशंकेसाठी थांबल्याने शिवाजी सगर हे रस्ता ओलांडत असतांना अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 7802 ही निष्काळजीपणे चालवून शिवाजी सगर यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात चालक अपघातस्थळावरुन मो.सा. सह पसार झाला. अशा मजकुराच्या आकाश सगर यांनी 24 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

उस्मानाबाद  -  शिवानी साळुंखे, रा. आळणी या 24 एप्रील रोजी राहत्या घरी असतांना पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावकरी- सतिश निंबाळकर यांनी शिवानी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवानी यांच्या बचावास आलेले शेजारील- आगतराव किर्दंत व मोहन वीर यांनाही सतिश निंबाळकर यांनी दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शिवानी साळुंखे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भारतीय दंड संहिता कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web