लॉकडाऊन : २५ एप्रिल रोजी ७३ पोलीस कारवायांत ४१ हजार दंड वसूल 

 
लॉकडाऊन : २५ एप्रिल रोजी ७३ पोलीस कारवायांत ४१ हजार दंड वसूल

उस्मानाबाद -  लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 25.04.2021 रोजी खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 9 कारवायांत- 2,100/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 40 कारवायांत- 20,000/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 23 कारवाया करुन 9,000/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 1 कारवाईत 10,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

नळदुर्ग: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने 25 एप्रील रोजी पो.ठा. हद्दीत 4 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले.

यात पहिल्या घटनेत शंकर सुभाष मोडके, रा. इटकळ, ता. तुळजापूर हे गावातील तुळजाभवानी हॉटेलसमोर देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 600 ₹)अवैधपणे बाळगलेले आढळले.

दुसऱ्या घटनेत मारुती गणपत कचरे, रा. आरळी (बु.), ता. तुळजापूर हे कोळेगाव येथील आवतान ढाब्याजवळ देशी दारुच्या 7 बाटल्या (किं.अं. 420 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.

तिसऱ्या घटनेत कालीदास विठ्ठल भोवाळ, रा. काळेगाव, ता. तुळजापूर हे काळेगाव येथील निवांत ढाब्याजवळ एका रबरी नळीमध्ये 15 लि. गावठी दारु (किं.अं. 900 ₹) बाळगलेले आढळले.

चौथ्या घटनेत 1)सुशिल संजय राठोड 2)सुबाबाई शिवाजी राठोड, दोघे रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर हे नळदुर्ग येथील शिवाजी राठोड यांच्या घरासमोर दोन कॅनमध्ये एकुण 10 लि. गावठी दारु (किं.अं. 820 ₹) बाळगलेले आढळले.

            यावरुन पोलीस पथकाने अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत नळदुर्ग पो.ठा. येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web