लॉकडाउन: २४ एप्रिल रोजी ९६ पोलीस कारवायांत 32 हजार दंड वसूल 

 
लॉकडाउन: २४ एप्रिल रोजी ९६ पोलीस कारवायांत 32 हजार दंड वसूल

उस्मानाबाद  -  लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 24.04.2021 रोजी खालील पाच प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 19 कारवायांत- 3,800/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 35 कारवायांत- 17,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 39 कारवाया करुन 7,800/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 2 कारवायांत 2,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

5)जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे: 1 कारवाईत- 1,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

 
अवैध मद्य विरोधी कारवाई

 भुम: 1)भास्कर बोराडे 2)प्रशांत बोराडे, दोघे रा. पाथ्रुड 3)धर्मा रांजवण 4)बाबुराव गायकवाड, दोघे रा. ईराचीवाडी, ता. भुम 5)सोमनाथ खंडागळे, रा. पाडोळी, त. भुम हे सर्वजण 23 एप्रील रोजी 21.30 वा. सु. पाथ्रुड बाजारतळ येथे देशी दारुच्या 238 बाटल्या (किं.अं. 14,280 ₹) अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना भुम पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींच्या ताब्यातील नमूद मद्य व दोन मोटारसायकल भुम पोलीसांनी जप्त केले आहेत.

उस्मानाबाद  -  विक्रम बाबुराव जगताप, रा. सातेफळ, ता. कळंब हे 24 एप्रील रोजी गावातील रस्त्याच्या कडेला एका पत्रा शेडजवळ अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 91 बाटल्या (किं.अं. 4,732 ₹) बाळगले असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळले. यावरुन पथकाने अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 तामलवाडी: अशोक विठ्ठल क्षिरसागर, रा. काटी, ता. तुळजापूर हे 24 एप्रील रोजी आपल्या राहत्या घरासमोर 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 850 ₹) बाळगले असतांना तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पथकाने गावठी दारु जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द तामलवाडी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web