लॉकडाउन: २३ एप्रिल रोजी ८५  पोलीस कारवायांत २६ हजार दंड वसूल 

 
लॉकडाउन: २३ एप्रिल रोजी ८५ पोलीस कारवायांत २६ हजार दंड वसूल

उस्मानाबाद : लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील तीन प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 20 कारवायांत- 4,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 30 कारवायांत- 15,000/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 35 कारवाया करुन 7,000/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

जुगार विरोधी कारवाई

मुरुम: जमीर महेबुब उडचने, रा. यशवंतनगर, मुरुम हे 23 एप्रील रोजी मुरुम बसस्थानकाजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,730 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

कळंब: रोहिदास ज्ञानोबा गायसमुद्रे, रा. कळंब हे 23 एप्रील रोजी शहरातील मराठवाडा खानावळीजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 780 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांच्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

अवैध मद्य विरोधी कारवाई

 कळंब: डिकसळ, ता. कळंब येथील लताबाई बाबुराव पवार या 23 एप्रील रोजी गावातील खडकी रस्त्यालगत एका कॅनमध्ये 5 लि. गावठी दारु विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेल्या तर दुसऱ्या घटनेत बोर्डा, ता. कळंब येथील बालु बन्शी काळे हे याच दिवशी धानोरा- बोर्डा रस्त्याने हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एव्ही 5741 वरुन देशी- विदेशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,216 ₹) अवैधपणे वाहुन नेत असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य व वाहतुकीस वापरलेली मो.सा. जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web