लॉकडाउन: २ मे  रोजी ७६  पोलीस कारवायांत २६ हजार दंड वसूल 

 
लॉकडाउन: २ मे रोजी ७६ पोलीस कारवायांत २६ हजार दंड वसूल

उस्मानाबाद - लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 02.05.2021 रोजी खालील पाच प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 12 कारवायांत- 2,400/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 21 कारवायांत- 10,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 38 कारवायांत 7,900/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 1 कारवाईत 1,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

5)जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे: एकुण 4 कारवायांत- 4,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.


मनाई आदेश झुगारुन दुकान चालू ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद -  कोविड- 19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जारी केलेले मनाई आदेश झूगारुन सिध्दीक इस्माईल शेख, रा. उस्मानाबाद यांनी दि. 02 मे रोजी 12.30 वा. सु. रामनगर येथील जॉनी हॉटेलच्या बाजूचे पान दुकान व्यवसायास चालू ठेउन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना अधिनियम कलम- 11 चे उल्लंघन केले. यावरुन आनंदनगर पो.ठा. चे पोकॉ- ज्ञानेश्वर कागदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथमखबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाई

तुळजापूर: रवी भगवान क्षिरसागर, रा. आपसिंगा, ता. तुळजापूर हे 02 मे रोजी आपल्या राहत्या घरासमोर अवैध विक्रीच्या उद्देशाने दोन कॅनमध्ये एकुण 10 लि. गावठी दारु (किं.अं. 700 ₹) बाळगलेले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी गावठी दारु जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web