शिकवणीला गेलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण 

 
शिकवणीला गेलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण

उस्मानाबाद -  जिल्ह्यातील एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) 13 मार्च रोजी 18.00 वा. सु. शिकवणीला जाते असे कुटूंबीयांना सांगुन घराबाहेर गेली. ती घरी न परतल्याने कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता गावातीलच एका युवकाने फुस लावून तीचे अपहरण केल्याचे समजले. अशा मजकुराच्या अपहृत मुलींच्या पित्याने 25 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

उस्मानाबाद - बार्शी नाका, उस्मानाबाद येथील ‘उमाशंकर लेडीज कलेक्शन’ दुकानात 24 मार्च रोजी 13.30 वा. सु. 5 अनोळखी व्यक्ती  कपडे खरेदीस आल्या होत्या. दरम्यान दुकानातील ग्राहकांच्या गर्दीचा फायदा घेउन त्यांनी दुकानातील साड्या- 9 नग व ड्रेस- 9 नग असा 20,680 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या दुकान मालक- अनिता नागेश बामणे यांनी 25 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद (ग्रा.): सुनिल गैबिराज अनपट, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांच्या घराचे कुलूप 25 मार्च रोजीच्या रात्री 3 अनोळखी पुरुषांनी  तोडून घरात प्रवेश केला आणि सुनिल अनपट यांना लाकडी फळीने मारहाण करुन जखमी केले. तसेच चाकु, लोखंडी टामीचा धाक दाखवून घरातील 50 ग्रॅम सुवर्ण दागिणे, 27,500 ₹ रक्कम व गल्लीतील ट्रक क्र. एम.एच. 25 एजे 0179 च्या इंधन टाकीतील 100 लि. डिझेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या सुनिल अनपट यांनी दिलेल्या प्रथम खबरेरुन भा.दं.सं. कलम- 458, 380, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा: सतीश व्यंकट खटके, रा. बोरी, ता. उमरगा हे 25 मार्च रोजी 12.30 वा. सु. उमरगा बसस्थानकात उमरगा- लातुर बसमध्ये चढत असतांना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या पिशवीतील स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या सतीश खटके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

 तामलवाडी: बलभिम नागनाथ घोडके, रा. मुस्ती, ता. सोलापूर (द.) व श्रीकांत शामराव जाधव, रा. काशेगाव, ता. सोलापूर (द.) हे दोघे दि. 11.02.2021 रोजी 21.00 वा. सु. माळुंब्रा- मसला असा मोटारसायकलने प्रवास करत होते. दरम्यान मसला शिवारातील रस्त्यावर अज्ञात चालकाने मोटारसायकल निष्काळजीपणे चालवून बलभिम घोडके चालवत असलेल्या मो.सा. ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात बलभिम घोडके हे मयत होउन श्रीकांत जाधव हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात मो.सा. चा अज्ञात चालक घटनास्थळावरुन मो.सा. सह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- महानंदा घोडके यांनी 25 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 

From around the web