उमरगा, पानवाडी येथे चोरीच्या घटना 

 
Osmanabad police

उमरगा: नागोराव लक्ष्मण वरवंटे, रा. उमरगा यांच्या जेकेकुर शिवारातील एमआयडीसी भुखंड क्र. एक्स 4 मधील दुकानाचे बांधकाम चालू असून त्या दुकानाच्या एका बाजूचे शटर सविता जाधव, मंगलबाई पाटोळे, आशाबाई खरात, सारीकाबाई खराते, व पिंटु सर्व रा. कुंभारपट्टी, उमरगा हे सर्वजण दि. 23 जून रोजीच्या पहाटे उघडून आतील ईलेक्ट्रीक साहित्य व नळ फिटींगचे साहित्य चोरुन नेत असतांना नागोराव वरवंटे यांना आढळले. अशा मजकुराच्या नागोराव वरवंटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
ढोकी: राहुल जयवंत देडे, रा. पानवाडी, ता. उस्मानाबाद हे दि. 23 जून रोजीच्या रात्री राहत्या घरा समोरील अंगनात झोपलेले असतांना त्यांच्या उषाखालील 10 ग्रॅम सुवर्ण दागिने, दोन भ्रमणध्वनी व 1,100 ₹ रोख रक्कम अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या राहुल देडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

उस्मानाबाद  -  चिलवडी, ता. उस्मानाबाद येथील सुनिल दत्तु दिंडोळे यांसह 3 कुटूंबीयांचा गल्लीतील नातेवाईक- फुलचंद नामदेव दिंडोळे यांसह 2 कुटूंबीयांचा गल्लीतील जागेत मोटारसायकल लावण्याच्या कारणावरुन दि. 22 जून रोजी 20.30 वा. सु. वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्पर विरोधी कुटूंबातील सदस्यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुनिल दिंडोळे व फुलचंद दिंडोळे या दोघांनी दि. 23 जून रोजी परस्परविरोधी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.

                                                                                  

From around the web