शिंगोली,सारोळा, शेकापूर,भांडगाव,काटगाव येथे चोरीची घटना 

 
शिंगोली,सारोळा, शेकापूर,भांडगाव,काटगाव येथे चोरीची घटना

परंडा: बालाजी अश्रुबा गायकवाड, रा. शेकापुर, ता. भुम यांनी दि. 08- 10.05.2021 रोजी दरम्यान गावकरी- ज्ञानदेव नरहरी गोरे यांच्या शेतगट क्र. 66 मधील 40- 45 ब्रास काळी माती एक्सकॅव्हेटर यंत्राने खोदून ट्रॅक्टर- ट्रॉली च्या सहायाने चोरुन नेउन स्वत:च्या शेतात टाकली. अशा मजकुराच्या ज्ञानदेव गोरे यांचा पुतण्या- शिवाजी गेनदेव गोरे यांनी दि. 15 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत भांडगाव, ता. परंडा येथील अविनाश जालिंधर धस यांच्या गावातीलच किराणा दुकानाचे शटर अज्ञात व्यक्तीने दि. 15.05.2021 रोजीच्या रात्री उचकटून आतील 7,000 ₹ रोख रक्कम तसेच गावकरी- अविदा कोळेकर व साधु जाधव या दोघांच्या घराचे कुलूप तोडून आतील एकुण 26 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या अविनाश धस यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग: दगडु दस्तगीर शेख, रा. काटगाव, ता. तुळजापूर हे दि. 14- 15.05.2021 रोजी दरम्यान बाहेर गावी गेले असता दरम्यानच्या काळात त्यांच्या घराच्या रवाजाचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने तोडून आतील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 20,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या दगडु शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  शशीकांत हनुमंत शिंदे, रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची बजाज सिटी मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एजी 9497 ही दि. 03.05.2021 रोजी 00.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर लावली होती. सकाळी 07.00 वा. सु. ती मो.सा. त्यांना लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शशीकांत शिंदे यांनी दि. 15 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : अमोल शहाजीराव रणदिवे, रा. सारोळा, ता. उस्मानाबाद यांच्या वरुडा रोड, उपळा (मा.) येथील ओडीएफसी ॲग्रो कंपनी गेट क्र. 654 च्या गुदामाचे शटर अज्ञात व्यक्तीने दि. 13- 14.05.2021 दरम्यानच्या रात्री उचकटून गुदामातील सोयाबिनच्या 25 कि.ग्रॅ. वजनाच्या 50 पिशव्या (किं. 65,000 ₹) चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या अमोल रणदिवे यांनी दि. 15 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

उमरगा: जकेकुरवाडी, ता. उमरगा येथील राम व्यंकट जमादार यांनी शेतजमीनीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 15.05.2021 रोजी 15.00 वा. सु. भाऊबंद- जितेंद्र बालाजी जमादार यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची मधमी दिली. अशा मजकुराच्या जितेंद्र जमादार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web