उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, नळदुर्ग येथे चोरीच्या घटना 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  -  दिनांक 02.07.2021 रोजी 03.07.2021 रोजीचे रात्रीचे वेळी सतीश अंबादास आगलावे ,रा.रामनगर यांचे राहते घरासमोर लावलेली हिरोहोंडा पॅशनप्रो मोटार सायकल क्रमांक आर जे 13 एसए 6607 ही कोणीतरी अज्ञाताने चोरुन नेली आहे. तर दिनांक  03.07.2021 ते 04.07.2021 चे रात्रीच्या वेळी शाहु नगर उस्मानाबाद येथुन कृष्णा भानुदास वायकर यांचे राहते घरासमोरुन एम एच 16 ए आर 860 ही बजाज कम्पनीची मोटार सायकल  कोणीतरी अज्ञाताने चोरुन नेली आहे. सतीश आगलावे व कृष्णा  वायकर यांनी दिनांक 06 जुलै रोजी  दिलेल्या दोन प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हे नोंदवलेले आहेत.


तुळजापूर: लोकमत तालुका प्रतिनिधी गोविंद व्यकंटराव खुरद,रा.सारा गौरव तुळजापूर हे दिनांक 06.07.2021 रोजी 15.20 वा  डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,तुळजापूर येथे खरेदी करता गेले होते. त्यांचे शर्टचे वरचे खिशातुन रेडमी नोट 9 कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला आहे. गोविंद खुरद यांनी  दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 उमरगा: दिनांक 03.07.2021 रोजी 10.00 ते 15.00 वा सु शिवपुरी रोड उमरगा येथुन मनोज मललीनाथ घंटे यांची  होडां कंपनीची युनिकार्न  मोटार सायकल क्रमांक एम एच 13 बी ई 2777 ही कोणीतरी अज्ञाताने चोरुन नेली आहे.  मनोज घंटे यांनी दिनाक 06 जुलै रोजी दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 नळदुर्ग: दिनांक 06.07.2021 चे दुपारी हनमुंत नारायण राउत,रा.सहकारी साखर कारखाना, नळदुर्ग यांचे राहते घराचे दरवाजाची कडी-कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील 18,000 रु रककम 4 कि.ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसुत्र असे कोणीतरी अज्ञाताने चोरुन नेले आहे.  हनुमंत राउत  यांनी दिनाक 06 जुलै रोजी दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web