उस्मानाबाद, लोणी, वाशी येथे चोरीच्या घटना 

 
उस्मानाबाद, लोणी, वाशी येथे चोरीच्या घटना

परंडा: आयुब शब्बीर पठाण, रा. लोणी, ता. परंडा यांच्या लोणी गट क्र. 147 मधील शेतातील विद्युत वायर, स्टार्टर व ऑटो स्वीच असे साहित्य अज्ञात व्यक्तीने दि. 08.05.2021 रोजी 15.00 वा. चे पुर्वी चोरुन नेले. अशा मजकुराच्या आयुब पठाण यांनी दि. 13 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  सुरेश रामेश्वर भगत, रा. शिक्षक कॉलनी, उस्मानाबाद यांची हिरो होंडा पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 3151 ही दि. 11.05.2021 रोजी 22.00 वा. सु. सांजा रोड, उस्मानाबाद येथील सिध्देश्वर वेल्डींग दुकानासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुरेश भगत यांनी दि. 13 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 वाशी: पारा, दसमेगांव, इंदापुर व पिंपळगाव (लिंगी) येथील जिओ, रिलायन्स व इंडस कंपनीच्या भ्रमणध्वनी मनोऱ्याखालील विद्युत निर्मीती यंत्राचे 80 लि. डिझेल, बॅटरी व केबल असे एकुण अंदाजे 30,000 ₹ किंमतीचे साहित्य दि. 05- 13.05.2021 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या अण्णासाहेब जगन्नाथ कोळेकर, रा. नरुटेवाडी, ता. सोलापूर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत रामचंद्र संभाजी हाके, रा. यशवंडी, ता. वाशी यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 12- 13.05.2021 दरम्यानच्या रात्री तोडून व स्वयंपाक खोलीचा दरवाजा उचकटून आतील पत्रा पेटीतील 50,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या रामचंद्र हाके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web