कळंब ,उस्मानाबाद,खानापूर येथे चोरीच्या घटना 

माळकरंजा , आरळी (खुर्द)  येथे हाणामारी 
 
Osmanabad police

कळंब: दादाहरी मोराळे, रा.बाबानगर, कळंब यांनी दि.27 जुन रोजी पहाटे घराची किल्ली खिडकीच्या आत ठेउन पत्नीसह पायी फिरायला गेले होते. ती किल्ली घेउन अज्ञाताने दाराचे कुलुप उघडुन घरातील दोन स्मार्टफोन चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

          तर कळंब येथील रमेश बारकुल, बालाजी बसाळगे, प्रणीत पाटील हे तिघे दि 28 जुन रोजी बागवान चौक परिसरात असतांना  तिघांच्या  खिशातील तीन स्मार्टफोन  अज्ञाताने चोरुन नेले.अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद ‍ शहरातील साप्ताहीक बाजार मैदान येथील दुकानासमोर ठेवलेले गजानन विभुते यांच्या मालकीचे लोखंडी नळ-सांगाडा असे साहित्य दि 26 जुन रोजी  04.20 वा अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : राजेंद्र कुदळे, रा. खानापुर यांनी दि 27 जुन रोजी परंडा- सोनारी रस्त्यावरील आपल्या हॉटेल समोर ठेवलेली त्यांची डिसकव्हर  मोटारसायकल  क्रमांक एम एच 25 झेड 5294 ही  अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाण

 शिराढोण:  माळकरंजा ता.कळंब  येथील अंकुश रामभाउ जाधव व संग्राम गोवर्धन जाधव या दोघा कुटुंबीयांचा दि 26 जुन रोजी 14.00 वा शेतामधे कुत्रे बसण्याच्या  कारणावरुन  शेतामध्ये वाद झाला.यात दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर विरोधी कुटुंबीयांस  शिवीगाळ करुन लोखंडी नळी, काठीने,  लाथा बुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी दिनांक 28 जुन रोजी दिलेल्या परस्पर विरोधी दोन प्रथम खबरे वरुन भादसं 324, 323, 504, 506, 34 दोन गुन्हे नोंदवले आहेत.

नळदुर्ग :  आरळी (खुर्द) येथील रहीवासी आमुलाल मिरास पठाण यांसह त्यांचा मुलगा अल्ताफ व सुन शाबेरा हे दि 28 जुन रोजी 12.30 वा आपल्या घरासमोर होते. यावेळी  गावकरी- महेबुब शेख यांसह त्यांची मुले मुर्तजा , ईस्माईल यांनी सांडपाण्याच्या कारणावरुन पठाण कुटुंबीयांना शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देवुन काठीने व लोखंडी गजाने मारहाण केली . अशा मजकुराच्या प्रथम खबरे वरुन भादसं 324,323,504,506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web