ढोकी, नाईचाकूर, जामगाव येथे चोरीच्या घटना 

 
Osmanabad police

ढोकी: व्यंकट महादेव क्षिरसागर व बालाजी रघुनाथ सुरवसे, दोघे रा. दत्तनगर, ढोकी, ता. उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 09- 10.06.2021 दरम्यानच्या रात्री तोडून घरातील अनुक्रमे सोन्या- चांदीचे दागिने, 26,000 ₹ रोख रक्कम व 39.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने- वस्तू व 1,00,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या व्यंकट क्षिरसागर व बालाजी सुरवसे या दोघांनी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम  खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.

            तिसऱ्या घटनेत ढोकी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यशाळेचा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि. 05- 06.06.2021 दरम्यानच्या रात्री उचकटून आतील टेबल, बार 10 नग,  लोखंडी गज 5 नग, ग्राइंन्डर, छत पंखा असे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या जयराम रामकृष्ण भोरे, रा. दारफळ, ता. उस्मानाबाद यांनी दि. 10 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा: संजय विश्वंभर कांबळे, रा. नाईचाकुर, ता. उमरगा हे दि. 09- 10.06.2021 दरम्यानच्या रात्री दरवाजा उघडा ठेउन घरात झोपले होते. दरम्यानच्या काळात घरातील 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 10,500 ₹ रोख रक्कम व स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या संजय कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा: जामगाव शिवारातील गट क्र. 35 / 1 मध्ये परंडा- करमाळा रस्त्यालगत जिओ भ्रमणध्वनी मनोऱ्याचे बांधकाम चालू असुन या मनोऱ्याच्या कुंपनातील एक्झीमो कंपनीच्या 2 व टाटा कंपनीची 1 बॅटरी दि. 29.04.2021 ते 05.06.2021 दरम्यानच्या काळात अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या ठेकेदार- विलास शिवराम शिंदे यांनी दि. 10 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 भुम: विलास बब्रुवान पाटुळे, रा. आरसोली, ता. भुम यांच्या शेत गोठ्यासमोरील दोन जर्सी गाई दि. 07- 08.06.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या विलास पाटुळे यांनी दि. 10 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
येरमाळा: तुकाराम शंकर लोमटे, रा. मलकापुर, ता. कळंब यांनी मलकापुर फाटा येथील सापनाई रस्त्यालगतच्या कुकूटपालन शेडसमोर लावलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 5892 ही दि. 09- 10.06.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या तुकाराम लोमटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web