रत्नापुर, सुरतगांव , बाभळगाव येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

येरमाळा: रत्नापुर , ता.कळंब येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचा कडी-कोयंडा दिनांक 04-5  जुलै दरम्यानच्या रात्री अज्ञाताने उचकटुन एक एल ई डी  टि.व्ही. चोरुन नेला.  अशा मजकुराच्या शाळा शिक्षक भाउसाहेब जाधवर यांनी दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी: सुरतगांव  गा्रमपंचायतीने गावातील शेततळयात  लावलेला तीन अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विदयुत पम्प अज्ञाताने दिनांक 28-29 जुन दरम्यानच्या रात्री चोरुन नेला. अशा मजकुराच्या गा्रमसेवक बापुराव दराडे  यांनी दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग: संजय चव्हाण यांनी बाभळगाव तलावावर लावलेला दहा अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विदयुत पम्प अज्ञाताने दिनांक 24-25 जुन दरम्यानच्या रात्री चोरुन नेला. अशा मजकुराच्या संजय चव्हाण   यांनी दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web