राजुरी, काक्रंबा येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

उस्मानाबाद -  चंद्रकांत राजाराम इंगळे, रा. राजुरी, ता. उस्मानाबाद यांची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 6200 सह डीकीतील ॲपटेक कंपनीचे बिलींग यंत्र दि. 22.05.2021 रोजी 12.00 वा. सु. शासकीय जिल्हा रुग्णालय परिसरातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या चंद्रकांत इंगळे यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर: भारत मोतीचंद गडदे, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर यांच्या तुळजापूर- लातूर पर्यायी मार्गावरील चहा टपरीचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 25- 26.05.2021 दरम्यानच्या रात्री तोडून आतील गॅस टाकी, खाद्य पदार्थ व 2,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या भारत गडदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


दोन ठिकाणी अपघात

 नळदुर्ग: भारत दादाराव घोंगडे, वय 60 वर्षे, रा. अणदुर, ता. तुळजापूर हे दि. 19.11.2020 रोजी 19.00 वा. सु . अणदुर येथील उड्डान पुलाजवळील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 एसी 0198 ने प्रवास करत होते. दरम्यान अज्ञात चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून भारत घोंगडे यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंर संबंधीत अज्ञात चालक वाहनासह अपघातस्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- अतुल घोंगडे यांनी दि. 26.05.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा: चालक- रियाजोद्दीन रफीक बागवान, रा. पटेलनगर, लातूर यांनी दि. 25 मे रोजी 05.45 वा. सु. उमरगा- लातूर रस्त्यावर मिनीट्रक क्र. एम.एच. 24 एयु 4415 हा निष्काळजीपणे चालवून मोहन आण्णाप्पा जमादार, वय 45 वर्षे, रा. कोरेगाववाडी, ता. उमरगा हे चालवत असलेल्या मोटारसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात मोहन जमादार हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- लक्ष्मीबाई जमादार यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 

From around the web