उस्मानाबाद जिल्ह्यात विनयभंग, अपहार, चोरी आदी गुन्हे दाखल 

 

उस्मानाबाद -  जिल्ह्यातील एका 22 वर्षीय युवक गावातीलच एका 17 वर्षीय मुलीचा (नाव- गाव गोपनीय) महिनाभरापासून पाठलाग करत असे. 22 मार्च रोजी 11.30 वा. सु. ती मुलगी शिकवणीला जात असतांना त्याने तीला आडवून लग्नाचा आग्रह करुन आपल्या कुटूंबीयांशी बळजबरीने बोलण्यास भाग पाडले. असे करण्यास तीने विरोध केल्याने तीला चापटाने मारहाण करुन कुटूंबीयांस ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने 26 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 323, 506, 341 सह पोक्सो कायदा कलम- 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपहार

भुम: भुम येथील रत्नमाला इन्डेन गॅस एजन्सी कामगार- शरद शिवाजी सपकाळ, रा. वडगाव (वारे), ता. भुम हे कार्यालयातील 1,93,930 ₹ रक्कम  व दिपक जगन्नाथ कदम यांनी स्वाक्षरीत केलेली कोरी धनादेश पुस्तीका 16 मार्च रोजी कार्यालयातून गुपचूपपणे घेउन गेले. अशा मजकुराच्या एजन्सी चालक- दिपक कदम यांनी दि. 26 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 408 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 चोरी

तामलवाडी: संतोष विश्वनाथ कापसे, रा. वडगाव (काटी), ता. तुळजापूर यांच्या शेत गट क्र. 71 मधील शेत विहीरीतील फ्लोएड कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विद्युत पंप 16- 26 मार्च रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या संतोष कापसे यांनी 26 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web