उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद - मानवी जिवीतास, रहदारीस धोका होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वाहन उभे करणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करणाऱ्या, कोविड- 19 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने जारी केलेले विविध मनाई आदेश झुगारुन दुकान- हॉटेल व्यवसायासाठी चालू ठेवणाऱ्यांवर  उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी संबंधीत पो.ठा. येथे 02 एप्रील रोजी खालील प्रमाणे गुन्हे दाखल केले.

 
 उस्मानाबाद येथील 1)अजित नागनाथ चेंडके 2)मोमीन सुफियान मुस्तफा या दोघांनी उस्मानाबाद शहरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी चहा हॉटेल व्यवसायास चालू ठेउन ग्राहकांची गर्दी जमवून कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची घातक कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महारष्ट्र कोविड- 19 उपाययोजना कलम- 11 चे उल्लंघन केले.

उस्मानाबाद येथील संतोष भारत राउत यांनी उस्मानाबाद बसस्थानक समोरील रस्त्यावर मानवी जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपणे आपल्या हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन तसेच कोविड- 19 च्या अनुषंगाने आवष्यकती खबरदारी न घेता निष्काळजीपणाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 285 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना कलम- 11 चे उल्लंघन केले.

समर्थनगर, उस्मानाबाद येथील किरण कदम यांनी  आपल्या  घरात गुटखा व सुगंधी तंबाखुजन्य पदार्थ अवैधपणे बाळगुन कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण होण्याची निष्काळजीपणाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 272, 273 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना कलम- 11 चे उल्लंघन केले.

उमरगा: 1)प्रभाकर अंबादास जगताप, रा. तुरोरी यांनी उमरगा बस्थानक समोरील रस्त्यावर ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 आर 6546 हा रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने उभा करुन तर 2)राहुल राजेंद्र सुरवसे 3)मुस्तकीम बागवान, दोघे रा. उमरगा यांनी आपापला फळगाडा आरोग्य नगर, उमरगा येथील रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.

लोहारा: कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जारी असलेल्या रात्रींच्या संचारबंदीचे उल्लंघन करुन लोहारा येथील जितमल किर व जिलानी बागवान या दोघांनी नाका- तोंडास मास्क न लावता लोहारा शहरात फिरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केले.

 
 उस्मानाबाद : कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर पानटपरी बंदीचा मनाई आदेश अंमलात असतांनाही प्रितेश प्रभाकर बनसोडे, रा. उस्मानाबाद यांनी मारवाड गल्ली, उस्मानाबाद येथे पानटपरी व्यवसायास चालू ठेउन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) चे उल्लंघन केले.

From around the web