उस्मानाबाद जिल्ह्यात 21 गुन्ह्यांतील 24 आरोपींना आर्थिक दंडासह कारावासाची शिक्षा

 
उस्मानाबाद जिल्ह्यात 21 गुन्ह्यांतील 24 आरोपींना आर्थिक दंडासह कारावासाची शिक्षा

उमरगा: कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर 21 मार्च रोजी लोकसेवकाने जारी केलेले आदेश झुगारुन विश्वनाथ वसंत घोडके, रा. उमरगा यांनी भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केल्याबद्दल 400 ₹ दंडाची शिक्षा तर मानवी जिवीत धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होईल अशा निष्काळजीपणे उमरगा येथील महामार्गावर ऑटोरीक्षा उभ्या करणाऱ्या हिप्परगाराव, ता. उमरगा येथील माधव सुर्यवंशी व अक्षय जाधव यांना भा.दं.सं. कलम- 283 च्या उल्लंघनाबद्दल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उमरगा यांनी 22 मार्च रोजी दोषी ठरवून अनुक्रमे  200 ₹ व 300 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 
उस्मानाबाद -  कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर 21 मार्च रोजी लोकसेवकाने जारी केलेले आदेश झुगारुन उस्मानाबाद येथील सादिक सौदागर यांनी आपले दुकान व्यवसासाठी चालू ठेउन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 चे उल्लंघन केल्याबद्दल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 22 मार्च रोजी दोषी ठरवून 500 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

परंडा: शिराळा, ता. परंडा येथील जमीन मुबारक शेख, वय 30 वर्षे यांनी सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे, निष्काळजीपणे वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्या प्रकरणी 1,000 ₹ दंडासह 1 महिना साध्या कारावासाची शिक्षा व दंड न भरल्यास 7 दिवसाच्या साध्या कारावासाची वाढीव शिक्षा तर मानवी जिवीत धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होईल अशा निष्काळजीपणाचे कृत्य केल्याबद्दल फकीर अकबर पठाण यांना भा.दं.सं. कलम- 283 च्या उल्लंघनाबद्दल 200 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी 23 मार्च रोजी सुनावली आहे.

 बेंबळी: दत्ता केशव वाघे यांनी सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे, निष्काळजीपणे वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्या प्रकरणी 1,000 ₹ दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 3 दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी सुनावली आहे.

तामलवाडी: मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे तामलवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्या आयाज पठाण, रा. पेठसांगवी, ता. उमरगा यांना 200 ₹ दंडाची तर तामलवाडी येथील महामार्गावर बेदरकारपणे, हयगईने ट्रक चालवून समीर चौधरी, रा. सोलापूर यांनी भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्याबद्दल 1,000 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी 23 मार्च रोजी सुनावली आहे.

 तुळजापूर: मानवी जिवीत धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होईल अशा निष्काळजीपणे उमरगा येथील महामार्गावर वाहन उभ्या करणाऱ्या दत्ता शेडगे, रा. ढेकरी व मारुती लाड, रा. तुळजापूर यांना भा.दं.सं. कलम- 283 च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून प्रत्येकी 200 ₹ दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 4 दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी 23 मार्च रोजी सुनावली आहे.

 शिराढोन: मानवी जिवीत धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होईल अशा निष्काळजीपणे महामार्गावर वाहन उभ्या करणाऱ्या हरीदास डोंगरे, रा. कोथळा व बाळासाहेब तनपुरे, रा. हिंगणगाव यांना भा.दं.सं. कलम- 283 च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून प्रत्येकी 200 ₹ दंडाची शिक्षा तर जुगार खेळून म.जु.का. कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याबद्दल राजाराम दिगंबर शेळके, रा. खामसवाडी यांना 300 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी 23 मार्च रोजी सुनावली आहे.

 ढोकी: मानवी जिवीत धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होईल अशा निष्काळजीपणे ढोकी येथील सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्या अलिम फय्याज बागवान, रा.तेर व आकाश रणजीत कदम, रा. कौडगांव यांना भा.दं.सं. कलम- 283 च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून प्रत्येकी 200 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 23 मार्च रोजी सुनावली आहे.

आंबी: आंबी पो.ठा. येथे दाखल 5 गुन्ह्यातील 8 आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी 22 मार्च रोजी खालीलप्रमाणे दंडात्मक शिक्षा सुनावल्या आहेत.

            कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर 21 मार्च रोजी लोकसेवकाने जारी केलेले आदेश झुगारुन सोनारी, ता. परंडा येथील रुबाब अंभिर तांबोळी व आतिष साहेबराव देशमुख या दोघांनी आपापल्या ताब्यातील दुकाने व्यवसायास चालू ठेउन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंधन केल्याबद्दल प्रत्येकी 500 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 3 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

मानवी जिवीत धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होईल अशा निष्काळजीपणे आनाळा- शेळगाव रस्त्यावर वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 च्या उल्लंघनाबद्दल भारत बिडवे यांना 200 ₹ दंड व दंड न भरल्यास 3 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

जुगार खेळून म.जु.का. कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याबद्दल भुजंग कवडकर, बिभीषन कवडकर, पंढरीनाथ जेकटे, शिवराज गरड या चौंघांना प्रत्येकी 300 ₹ दंड व कोर्ट उठेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली.

न्यायालयीन सम्नस व वॉरन्टची  अवमानना करुन जाणीवपुर्वक न्यायालयात गैरहजर राहुन भा.दं.सं. कलम- 229 (अ) चे उल्लंघन करणाऱ्या आनंदा हरीदास वायसे, रा. कुक्कडगाव, ता. परंडा यांना 1,000 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 3 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

From around the web