उस्मानाबाद जिल्ह्यात आठ गुन्ह्यातील 12 आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा

 
उस्मानाबाद जिल्ह्यात आठ गुन्ह्यातील 12 आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा

लोहारा: इम्रान तय्यब आळंदकर यांनी लोहारा येथील सार्वजनिक रस्त्यावर ऑटोरीक्षा बेदरकारपणे, निष्काळजीपणे चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्याबद्दल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, लोहारा यांनी 1,000 ₹ दंडाची शिक्षा 24 मार्च रोजी सुनावली आहे.

 बेंबळी: प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 25 मार्च रोजी बेंबळी पो.ठा. येथील 2 गुन्‍ह्यात शिक्षा सुनावल्या.

सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे, निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास व मानवी दुखापतीस कारणीभुत होउन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 चे उल्लंघन केल्याप्रकरणी एका व्यक्तीस 1,300 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 8 दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

एकाच कुटूंबातील 4 व्यक्तींनी गावातील व्यक्तीस मारहाण करुन भा.दं.सं. कलम- 323, 34 चे उल्लंघन केल्या प्रकरणी न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत न्यायालयात बसण्याची शिक्षा व मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीस एकुण 3,000 ₹ रक्कम नुकसान भरपाईपोटी देण्याचा आदेश सुनावला आहे.

 भुम: शिवलिंग हरीभाऊ माळी यांनी मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावरील हातगाड्यात अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केल्याबद्दल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, भुम यांनी 1,000 ₹ दंडाची शिक्षा 25 मार्च रोजी सुनावली आहे.

 वाशी: बाबासाहेब चंद्रकांत हुंबे व निशाद दिलशाद काझी या दोघांनी मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे सार्वजनिक रस्त्यावरील हातगाड्यात अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केल्याने त्यांना प्रत्येकी 1,000 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी यांनी 25 मार्च रोजी सुनावली आहे.

 उस्मानाबाद (ग्रा.): राहुल सुरेश भिंगडे यांनी सार्वजनिक रस्त्यावर वाहन बेदरकारपणे, निष्काळजीपणे चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्याने त्यांना 500 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 25 मार्च रोजी सुनावली आहे.

 शिराढोन: नुर अहमद शेख, रा. नायगांव व शिवाजी मारुती हाटकर, रा. गोविंदपुर यांनी जुगार खेळून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याने त्यांना प्रत्येकी 300 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी 25 मार्च रोजी सुनावली आहे.

From around the web